ट्रकच्या धडकेत बसथांबा भुईसपाट ; वळणावर ताबा सुटल्याने अपघात

पौड : पुढारी वृत्तसेवा : ट्रकचालकाचा ताबा वळणावर सुटल्याने पत्र्याने भरलेला भरधाव ट्रक थेट मार्गालगतच्या बसथांब्याला धडकून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसथांबा पूर्णपणे भुईसपाट झाला. पौड ते पुणे मार्गावरील धनवेवाडी येथे वळणावर शनिवारी (दि. 27) रात्री हा अपघात घडला. शनिवारी माणगावहून एक ट्रक पुण्याकडे पत्रा घेऊन जात होता. रात्री … The post ट्रकच्या धडकेत बसथांबा भुईसपाट ; वळणावर ताबा सुटल्याने अपघात appeared first on पुढारी.

ट्रकच्या धडकेत बसथांबा भुईसपाट ; वळणावर ताबा सुटल्याने अपघात

पौड : Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रकचालकाचा ताबा वळणावर सुटल्याने पत्र्याने भरलेला भरधाव ट्रक थेट मार्गालगतच्या बसथांब्याला धडकून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसथांबा पूर्णपणे भुईसपाट झाला. पौड ते पुणे मार्गावरील धनवेवाडी येथे वळणावर शनिवारी (दि. 27) रात्री हा अपघात घडला. शनिवारी माणगावहून एक ट्रक पुण्याकडे पत्रा घेऊन जात होता. रात्री धनवेवाडी येथे हा ट्रक आला असता वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव ट्रक थेट तेथे असलेल्या बसथांब्याला धडकला. यामध्ये बसथांबा पूर्णपणे मोडून भुईसपाट झाला.
पुढे मार्गावरुन खाली जात हा ट्रक पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला.अपघात झालेल्या ठिकाणाजवळच राहणारे आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे आणि त्यांच्या पथकाने जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी पुणे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने हा अपघात रात्रीच्या वेळी घडला, तसेच ट्रकमध्येही दुसरे प्रवासी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. मात्र प्रवाशांसाठी असणारा बसथांबा या अपघातात भुईसपाट झाला असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तातडीने हा बसथांबा उभारावा, अशी मागणी होत आहे.
Latest Marathi News ट्रकच्या धडकेत बसथांबा भुईसपाट ; वळणावर ताबा सुटल्याने अपघात Brought to You By : Bharat Live News Media.