जळगाव : भुसावळ शेतकी संघात आजी-माजी आमदार समारोसमोर
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
भुसावळ शेतकी संघ निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी व त्यांचे एकेकाळचे स्विय सहाय्यक व विद्यमान आमदार सावकारे यांच्यात पुन्हा आमना सामना होणार आहे. चार फेब्रुवारी रोजी मतदानातून सामना रंगणार आहे. तर पाच 5 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे.
जळगाव जिल्हा हा राजकारणातील लक्षवेधी बदलीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील राजकारणात कोण कोणाकडे केव्हा जाईल व कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे तूर्तास तरी कोणीच सांगू शकत नाही. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक असलेले विद्यमान आमदार भाजपाचे संजय सावकारे एकेकाळी सोबत होते. भुसावळ तालुक्यावर आरक्षण आल्यानंतर विद्यमान आमदार संजय सावकारे यांना संधी देण्यात आली. यानंतर आजी व माजी आमदारांमध्ये कटूता आली या कटुतेतून दोन्ही नेते समोरासमोर येऊन ठेपले आहेत. भुसावळ बाजार समितीमध्ये झालेल्या निवडणुकीत आमदारांनी 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला तर तीन जागांवर माजी आमदारांच्या समर्थकांनी विजय मिळवला.
पुन्हा शेतकी संघाच्या निवडणूक प्रक्रिया लागलेली आहेत या निवडणुकीत भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल तर माजी आमदार संतोष चौधरी व जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, शरद पवार गट यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे. एकूण 15 जागांसाठी ही लढत होत असून 15 जागांवर 30 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या 15 जागांसाठी सतराशे पन्नास मतदार आहेत. जे चार फेब्रुवारीला मतदान करणार आहेत. मुख्यतः भुसावळ व बोदवड तालुक्यातील मतदार मतदान करणार आहेत. शेतकी संघावर पुन्हा माजी आमदारांचे वर्चस्व राहणार की विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहणार याबाबत पाच फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता हॉलमध्ये होणा-या मतमोजणी मधून हे समजणार आहे. भुसावळ शेतकी संघ निवडणुकीत सभासद मतदारसंघात तीन जागा, संस्था सभासद मतदारसंघात सात जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती, मतदार संघ एक, इमाव एक महिला राखीव दोन जागा अनुसूचित जाती मतदारसंघासाठी एक जागा अशाा जागांसाठी ही सरळ लढत होणार आहे.
हेही वाचा:
Crime news : वडिलांचा खून करणार्या मुलाला जन्मठेप
सर्वेक्षणातील अडचणी दूर ; आयोग, गोखले संस्था, एनआयसी यांचे सहकार्य
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला साहित्य संमेलन तयारीचा आढावा
Latest Marathi News जळगाव : भुसावळ शेतकी संघात आजी-माजी आमदार समारोसमोर Brought to You By : Bharat Live News Media.