कॅल्शियम कमी असण्याची ‘ही’ असतात लक्षणे

नवी दिल्ली : मेंदू आणि एकंदरीतच संपूर्ण शरीरासाठी कॅल्शियम गरजेचे असते. प्रामुख्याने याचा सरळ संबंध आपल्या शरीरातील हाडे, दात, स्नायू आणि मज्जातंतूशी येतो. कॅल्शियममुळे स्नायूंची हालचाल, मज्जासंस्थेद्वारे मेंदू आणि शरीराच्या दुसर्‍या अवयवांना संदेश द्यायला मदत होते. हे पूर्ण शरीरात रक्ताला एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेण्याकरिता रक्तवाहिन्यांची मदत करते. शरीरात याची अनेक कार्ये आहेत. शरीरातील कॅल्शियमच्या … The post कॅल्शियम कमी असण्याची ‘ही’ असतात लक्षणे appeared first on पुढारी.

कॅल्शियम कमी असण्याची ‘ही’ असतात लक्षणे

नवी दिल्ली : मेंदू आणि एकंदरीतच संपूर्ण शरीरासाठी कॅल्शियम गरजेचे असते. प्रामुख्याने याचा सरळ संबंध आपल्या शरीरातील हाडे, दात, स्नायू आणि मज्जातंतूशी येतो. कॅल्शियममुळे स्नायूंची हालचाल, मज्जासंस्थेद्वारे मेंदू आणि शरीराच्या दुसर्‍या अवयवांना संदेश द्यायला मदत होते. हे पूर्ण शरीरात रक्ताला एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेण्याकरिता रक्तवाहिन्यांची मदत करते. शरीरात याची अनेक कार्ये आहेत. शरीरातील कॅल्शियमच्या आवश्यक मात्रेवर लक्ष देणे गरजेचे असते.
जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमी असेल तेव्हा विविध प्रकारच्या लक्षणांची माहिती पडते, तसेच हे लक्षात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे की, ही लक्षणे खूप वेळेस गंभीर रूप घेऊ शकता. ज्यामुळे आरोग्याची समस्या हाऊ शकते. कॅल्शियम स्नायू फंक्शन आणि ऊर्जा उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. याची कमतरता थकवा आणि अशक्तपणाचे कारण बनू शकते. सोबतच सहनशीलताही कमी होऊ शकते.
ज्यामुळे आपल्याला काहीच काम करायची इच्छा होत नाही. मसल्स क्रॅम्प होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. ही समस्या गंभीर तेव्हा होते जेव्हा ही सारखीसारखी होते. मसल्स क्रॅम्प बहुतांशी हातात आणि पायात होते. हे अचानक येते म्हणून दुखणे जास्त असते. मसल्स कॅ्रम्प येत असेल, तर कळते की तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी आहे.
नर्व्हस सिस्टीम म्हणजेच चेतासंस्था शरीरातील सर्व अवयवांना एकमेकांसोबत जोडायला मदत करते. ती श्वास घेणे, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करायला मदत करते. मज्जातंतू चांगल्या प्रकारे काम करेल, यासाठी शरीरात कॅल्शियमची मात्रा योग्य प्रमाणात हवी. जर शरीरात कॅल्शियम कमी असेल, तर हात आणि पायाला मुंग्या येतात, तसेच ते सुन्न होतात. कॅल्शियम कमी असल्यास बोटांची नखे कमजोर आणि नाजुक होतात आणि ती लगेच तुटतात. याशिवाय दातांमध्ये कीड, दात कमजोर होणे आणि हिरड्यांची समस्या ही कॅल्शियम कमतरतेमुळे होते.
Latest Marathi News कॅल्शियम कमी असण्याची ‘ही’ असतात लक्षणे Brought to You By : Bharat Live News Media.