अमेरिका चौताळली, इराणमध्ये घुसून करणार हल्ला?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इराण समर्थित हुथी बंडखोरांनी जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ला केला, ज्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले. या हल्ल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर इराणविरुद्ध युद्ध सुरू करण्यासाठी राजकीय दबाव वाढला आहे. बायडेन यांनी इराणविरुद्ध कोणतीही थेट कारवाई करण्याचे टाळले असले तरी युनायटेड स्टेट्स याचा कथितरित्या बदला म्हणून इराण-समर्थित गटांवर हल्ले करण्याची तयारी करत आहे.
जॉर्डन येथील अमेरिकेच्या एका लष्करी चौकीवर सोमवारी ड्रोन हल्ला झाला होता. यात अमेरिकेच तीन जवान ठार झाले, तर ३० सेवा कर्मचारी जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात अमेरिकन सैनिक मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याता प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते. इराण-समर्थित गटांवर बदला म्हणून हल्ले करण्याची तयारी अमेरिकेकडून केली जात आहे. ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेन पेंटागॉनच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत ही सूडाची कारवाई सुरू होऊ शकते.
Latest Marathi News अमेरिका चौताळली, इराणमध्ये घुसून करणार हल्ला? Brought to You By : Bharat Live News Media.