बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी चार दिवसांचा कालावधी : गडकरी
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात गेली ९ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे ऑपरेशन सुरु आहे. आज या रेस्क्यू आपरेशनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आज (दि. १९) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या सिल्क्यारा भागात सुरु असलेल्या बचावकार्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (PMO) चार वेगवेगळ्या आघाड्यांवर बचाव कार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. प्रत्येकाचे व्यवस्थापन वेग-वेगळ्या एजन्सी करत आहे. बचाव कार्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज (दि. १९) उत्तराखंडमध्ये पोहोचले. यावेळी गडकरी म्हणाले की, ऑगर मशीनने योग्य प्रकारे काम केल्यास सुमारे 2 ते 3 दिवसांत अडकलेल्या ४१ कामगारांची सुटका होऊ शकते.
उत्तराखंडच्या सिल्क्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून बचावकार्य सुरुच आहे. आतापर्यंत केवळ २४ मीटरपर्यंत पाइप ढिगाऱ्यात पोहोचली आहे. ड्रिलिंग दरम्यान हादऱ्याने बचावपथकाच्या दिशेने आणखी ढिगारा कोसळल्याने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळच्या दरम्यान बचावकार्य ठप्प झाले होते. ड्रिलिंगसाठी अमेरिकेन ऑगर मशीनमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने अडथळा येत होता.
The post बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी चार दिवसांचा कालावधी : गडकरी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात गेली ९ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे ऑपरेशन सुरु आहे. आज या रेस्क्यू आपरेशनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आज (दि. १९) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आली आहे. उत्तराखंडच्या सिल्क्यारा भागात सुरु असलेल्या बचावकार्याबाबत पंतप्रधान …
The post बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी चार दिवसांचा कालावधी : गडकरी appeared first on पुढारी.