सांगली : जतमध्ये सोळा लाखाच्या साहित्यांची परस्पर विक्री; कामगारावर गुन्हा
जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. म्हैसाळ कॅनॉलचे सिमेंट काँक्रीट अस्तरीकरणाचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. या ठेकेदाराने कामावर नेमलेल्या कामगारावर विश्वास ठेवून कामावरील साहित्य व मशिनरी त्याच्या ताब्यात दिली. परंतु या कामगाराने १६ लाख २० हजार किमतीचे जेसीबी व काँक्रीट मिशनची परस्पर विक्री केली. ठेकेदाराचा विश्वासघात केल्याप्रकरणी किशोर तिरुपती नायडू मरीपी (रा. रवीवलसा, आंध्रप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे अस्तरीकरणाचे काम आहे. आंध्रप्रदेशातील रमेश गोटटीपाटी या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. त्यांनी त्यांच्याकडे किशोर मरीपी यांच्याकडे काम करून घेण्याची जबाबदारी दिली होती. म्हैसाळ कॅनॉल काम संपल्यानंतर किशोर मरीपी याच्याकडे ठेकेदाराचे साहित्य होते. दरम्यानच्या कालावधीत जेसीबी, काँक्रीट मशीन ,पेविंग मशीन व अन्य साहित्य असे १६ लाख २० हजार किमतीचे साहित्य ठेकेदार रमेश गोटटीपाटी यांना न विचारता या कामगाराने परस्पर विकले. कामगाराने विश्वासघात केल्याचे निदर्शनास येताच बाबू गोटटीपाटी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
Bhogavati sugar factory election : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरशीने ८६. २६ टक्के मतदान; सोमवारी मतमोजणी
जळगाव : चोऱ्यांचे सत्र कायम; एरंडोल येथे दागिने, रोकड चोरीला
Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी
The post सांगली : जतमध्ये सोळा लाखाच्या साहित्यांची परस्पर विक्री; कामगारावर गुन्हा appeared first on पुढारी.
जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. म्हैसाळ कॅनॉलचे सिमेंट काँक्रीट अस्तरीकरणाचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. या ठेकेदाराने कामावर नेमलेल्या कामगारावर विश्वास ठेवून कामावरील साहित्य व मशिनरी त्याच्या ताब्यात दिली. परंतु या कामगाराने १६ लाख २० हजार किमतीचे जेसीबी व काँक्रीट मिशनची परस्पर विक्री केली. ठेकेदाराचा विश्वासघात केल्याप्रकरणी …
The post सांगली : जतमध्ये सोळा लाखाच्या साहित्यांची परस्पर विक्री; कामगारावर गुन्हा appeared first on पुढारी.