कौतुकास्पद ! अभियंता बनला शेतकर्यांसाठी रोलमॉडेल

सुषमा नेहरकर-शिंदे
शिवनेरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या सिद्धेश साकोरे या तरुणाने नोकरीची कास न धरता गावात राहून नैसर्गिक शेती करण्याचा व आपल्या परिसरातील शेतकर्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय घेतला. या उद्देशानेच त्याने अॅग्रो रेंजर्स संस्थेची स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सिध्देश आज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत आर्थिक पाठबळदेखील देण्याचे काम करत आहे. स्वतःच्या पडीक रानमाळात त्याने अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणजेच मिश्रफळ-पीक बाग लागवडीचे मॉडेल विकसित केले आहे.
शिरूर तालुक्यातील केंदूर गावचा सिद्धेश साकोरे याने अॅग्रो रेंजर्स संस्थेची स्थापन करून आपले सहकारी जयदीप सरोदे व अन्य सहकार्यांच्या मदतीने सध्या शिरूर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांसोबत शेतजमिनीच्या मातीची गुणवत्ता सुधारविण्याकरिता आणि शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी काम सुरू केले आहे. मागील वर्षभरात तब्बल 100 एकर जमिनीवर त्यांनी काम केले आहे. या जमिनीवर अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणजेच मिश्रफळ-पीक बाग लागवडीसाठी शेतकर्यांना त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत असताना फळझाडे, नैसर्गिक बी-बियाणे वाटप करणे, ड्रीपची सुविधा निर्माण करून देणे, जैविक खते, कंपोस्ट खते देखील मोफत वाटप केली जातात.
एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात तयार होणारा शेतीमाल विक्रीसाठीदेखील मदत केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार खते-औषधे वापरून मातीची ढासळलेली गुणवत्ता पूर्ववत करणे व शेतकऱ्यांचे उत्पादन दोन लाखापर्यंत वाढविणे या उद्देशाने सिध्देश सध्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. मागील वर्षभरात शिरूर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील 70 ते 80 शेतकऱ्यांच्या शेतात अॅग्रोफॉरेस्ट्री विकसित करण्यात आली असून तब्बल 40 हजार फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने आंबा, लिंबू, आवळा, सीताफळ, चिकू, पेरू, चिंच, डाळिंब, शेवगा, पपई आणि इत्यादी विविध 30 प्रकारची जैवविविधता असलेली झाडे लावण्यात आलेली आहे. शेतीतील रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे हाच उद्देश घेऊन सिद्धेश सध्या काम करत आहे.
गेले वर्षभरात शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील 70 ते 80 शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर अॅग्रोफॉरेस्ट्री मॉडेल विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. पुढील वर्षभरात शेतकऱ्यांची ही संख्या 200 ते 250 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळावे, मातीची गुणवत्ता सुधारावी व शेतकऱ्यांचा आर्थिक विकासदेखील व्हावा, या उद्देशानेच आम्ही हे काम करत आहोत.
– सिध्देश साकोरे, संस्थापक, अॅग्रो
Latest Marathi News कौतुकास्पद ! अभियंता बनला शेतकर्यांसाठी रोलमॉडेल Brought to You By : Bharat Live News Media.
