अयोध्येत अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यानंतर देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. या सोहळ्याला काल देशभरातील साधू, संत, सेलिब्रेटी, खेळाडू, गायक यांसारखे दिग्गज उपस्थित होते. यानंतर आज (दि.२३) सर्वसामान्य नागरिकांना आज सकाळपासून रामलल्लाचे दर्शन खुले करण्यात आले. सुरक्षित वातावरणात आतापर्यंत सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Ram Lalla Darshan)
अयोध्येत आज सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तितक्याच संख्येने भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत असून, भाविकांना अखंड दर्शन मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे देखील एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Ram Lalla Darshan)
#WATCH | Around 2.5 lakh to 3 lakh devotees have taken the darshan of Ram Lalla in Ayodhya today. A similar number of devotees are awaiting darshan, and the local administration is making all the arrangements to provide continuous darshan to the devotees. The situation is under… pic.twitter.com/j6nyHvca9S
— ANI (@ANI) January 23, 2024
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात आजही लाखो भाविक रामललाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत. मंदिर परिसरात स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी 8000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि विशेष डीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राम मंदिराच्या आत उपस्थित आहेत.
हेही वाचा:
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर बुधवारी सुनावणी
Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…
Eknath Shinde On Thackeray: ‘त्यांचं’ वागणं म्हणजे लग्न एकाशी अन् संसार दुसऱ्याशी- मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका
Latest Marathi News अयोध्येत अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.