मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे स्पष्ट चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र, दोघांपैकी कोण … The post मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’ appeared first on पुढारी.

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे स्पष्ट चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र, दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार?, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे. ( Lagnakallol Movie )
संबंधित बातम्या 

Movie Sridevi Prasanna : सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे “दिल में बजी गिटार” गाणं प्रदर्शित
Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…
Fighter : रिलीज आधी ‘फायटर’ची ॲडव्हान्स बुकिंग, १ कोटींची तिकिट्स विक्री

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केलं आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी सांगितले की, “या चित्रपटात भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झालं आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकार इतके कमालीचे आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की !’’

Latest Marathi News मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’ Brought to You By : Bharat Live News Media.