चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही : सुषमा अंधारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारलेल्या सत्तारुपी वारुळात गद्दार विषारी नाग सध्या वास्तव करीत आहेत, अशा शब्दांत सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट व भाजपावर जहरी टीका केली. अयोध्येतील सोहळा हे भाजपाचे राजकीय टुलकिट असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे सांगत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्याचे … The post चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही : सुषमा अंधारे

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारलेल्या सत्तारुपी वारुळात गद्दार विषारी नाग सध्या वास्तव करीत आहेत, अशा शब्दांत सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट व भाजपावर जहरी टीका केली. अयोध्येतील सोहळा हे भाजपाचे राजकीय टुलकिट असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे सांगत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्याचे कार्य केले.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७२ हजार कोटींचा घोटाळा ७२ तासांमध्ये विसरुन जात घोटाळा करणाऱ्या व्यक्तीच्या मांडीला-मांडी लावून बसतात. इकडे देवेंद्र फडणवीस कदापीही अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी होणार नाही, असे सांगतात. मात्र, दुपारी पळून जाऊन लव्ह मॅरेज करतात. त्यामुळे किमान रामाचे नाव घेताना प्रभु रामांप्रमाणे एकवचनी राहा, असा खोचक टोला त्यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. राजकारणातील र कळत नसलेले दीड-दोन फुटांचे पिल्ले सध्या आमच्या घरातील महिलांवर बोलतात. मात्र, एक लक्षात ठेवा आम्ही रडणार नाही तर शेवटपर्यंत लढणार असा इशारा अंधारेंनी आ. नितीश राणे यांना दिला.
पालकमंत्री दादा भुसे यांचा नामाेल्लेख टाळत नाशिकमध्ये ललित पाटीलला पाठिशी घालणाऱ्या पांढऱ्या दाढीतील व्यक्ती, छोटी-मोठी भाभी व सत्ताधारी आमदारांशी आमचा लढा कायम आहे, असा एल्गार अंधारेंनी केला.
हेही वाचा :

कांद्याबाबत सरकारला विचारण्याची 38 खासदारांमध्ये हिंमत नाही : खा. सुळे
अंगणवाडी सेविका आंदोलन : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी

Latest Marathi News चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही : सुषमा अंधारे Brought to You By : Bharat Live News Media.