
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेत डॉक्टरच्या रूपात महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड पुन्हा नव्या रुपात दिसणार आहे. किरणला सध्या कोणाचा तरी ‘नाद’ लागला आहे. (Kiran Gaikwad) हा ‘नाद’ कोणाचा आहे हे लवकरच समजेल, पण ‘नाद – द हार्ड लव्ह’ असं शीर्षक असलेल्या किरणचा आगामी मराठी चित्रपट येणार आहे. भोरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. (Kiran Gaikwad)
संबंधित बातम्या –
Movie Sridevi Prasanna : सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे “दिल में बजी गिटार” गाणं प्रदर्शित
Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…
Prasad Oak :’रीलस्टार’ चित्रपटात झळकणार प्रसाद ओक
शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत ‘नाद’ची निर्माती करण्यात येत आहे. संजय बाबुराव पगारे आणि रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा ‘मिथुन’, ‘रांजण’, ‘बलोच’ फेम प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे.
‘नाद’बाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की, या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेली प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. विविध छटा असलेल्या या लव्हस्टोरीमध्ये नातेसंबंधांचे विविध रंगही दिसतील. ‘नाद’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट एकप्रकारे प्रेमासोबतच मानवी भावभावनांचा आलेखच मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. यासाठी किरण गायकवाडसारखा तगड्या अभिनेत्याची आम्हाला गरज होती. पटकथा आणि कॅरेक्टर ऐकवताच त्याला ते भावलं आणि त्याने होकार दिला. किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री झळकणार असल्याचेही पवार म्हणाले.
‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी वैभव देशमुख यांच्या साथीने गीतलेखनही केलं असून, त्यांच्या संगीतरचना संगीतकार पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. डिओपी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा निगार शेख यांनी केली असून, कोरिओग्राफर सिद्धेश दळवी आहेत. आमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.
Latest Marathi News देवमाणूस फेम किरण गायकवाडचा ‘नाद’ येतोय, भोरमध्ये शूटिंग Brought to You By : Bharat Live News Media.
