कोल्हापूर: बिद्री निवडणुकीच्या तोंडावर कपिलेश्वर येथे नेत्यांना गावबंदी
सरवडे, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. याच धर्तीवर ऊसदर आंदोलनासाठी कपिलेश्वर (ता.राधानगरी) येथील ग्रामस्थांनी आधी उसाचं मिटवायचं आणि मगचं गावात यायचं, असा ठराव केला आहे. गावात डिजिटल बोर्डद्वारे ऐन बिद्रीच्या निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार व सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत ऊसदराच्या संघर्षासाठी ऊस उत्पादकांचा आक्रोश दिसून आला.
गत हंगामातील ऊसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामाला ३५०० रुपये दर मिळावा, अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. महागलेली रासायनिक खते, मजुरीची दरवाढ, वाढीव पाणीपट्टी, बी बियाणे, औषधे व मशागतीला तिपटीने खर्च होत असल्याने ऊस उत्पादकांना शेती परवडत नाही. परंतु, साखर, इथेनॉल व उपपदार्थांना बाजारात चांगला भाव मिळत असताना ऊस उत्पादकांना दर देणे का परवडत नाही? त्यामुळे गत हंगामातील ४०० रुपये व चालू गळीत हंगामाला ३५०० रुपये जाहीर करायचा असेल, तरच बिद्रीच्या उमेदवार व सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश तसेच मागणी मान्य असल्यास ग्रामपंचायत अथवा ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडे तसे लेखी स्वरूपात देणे. अन्यथा शेतकऱ्यांचं पण ठरलयं…… सर्वांना गावात प्रवेश बंदी असेल. अशा आशयाचे डिजिटल बोर्ड ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गावातील चौकात लावले आहेत.
हेही वाचा
Swabhimani Shetkari Sanghatana protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन तीव्र; जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वाभिमानी’चा चक्काजाम
कोल्हापूर : कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टिमेटम : राजू शेट्टी
मुकादमांकडून ऊस वाहतुकदारांची 448 कोटींची फसवणूक: राजू शेट्टी
The post कोल्हापूर: बिद्री निवडणुकीच्या तोंडावर कपिलेश्वर येथे नेत्यांना गावबंदी appeared first on पुढारी.
सरवडे, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. याच धर्तीवर ऊसदर आंदोलनासाठी कपिलेश्वर (ता.राधानगरी) येथील ग्रामस्थांनी आधी उसाचं मिटवायचं आणि मगचं गावात यायचं, असा ठराव केला आहे. गावात डिजिटल बोर्डद्वारे ऐन बिद्रीच्या निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार व सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत ऊसदराच्या संघर्षासाठी ऊस …
The post कोल्हापूर: बिद्री निवडणुकीच्या तोंडावर कपिलेश्वर येथे नेत्यांना गावबंदी appeared first on पुढारी.