जळगाव : चोऱ्यांचे सत्र कायम; एरंडोल येथे दागिने, रोकड चोरीला
जळगाव: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरटे व घरात घोरपडी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पोलीस प्रशासनामध्ये दररोज अनेक मोटरसायकली चोर किंवा घरफोडीचे गुन्हे दाखल होत आहेत. एरंडोल येथे ४ लाख ८८ हजार ६४२ रुपये तर पाचोरा येथे ५९ हजार रुपयांचे सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडेल येथील कागदीपुरा येथे राहणारे खालील अहमद रफीक अहमद हे अमरावती येथे लग्नासाठी गेले होते. याचा फायदा घेऊन दोन लाख 38 हजार 642 रुपये, 43 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन लाख पन्नास हजार रुपये रोख असे चार लाख 88 हजार 642 रुपयांचा ऐवज व रोख रक्कमेवर चोटट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी एरंडोल पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पाचोरा येथे सुभाष विठ्ठल पाटील (सारे बुद्रुक) यांच्या घरातील 59 हजार रुपयांचे दागिने आणि चार हजार रुपये रोख असे अज्ञात चोरट्याने चोरून पसार झाले.
याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन घटनांमध्येच पाच लाख 47 हजार 642 रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आहे.जिल्ह्यात दररोज मोटरसायकल चोरी, घरफोडी या सारख्या घटना घडत असतानाच पोलीस प्रशासन यावर अंकुश आणण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा
जळगावमध्ये पोलीस भरती परिक्षेत ब्लूटूथचा वापर, दोघांना अटक; एरंडोल पोलिसांची कारवाई
जळगाव : महाड येथे 2 लाख 24 हजारांची घरफोडी
जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी
The post जळगाव : चोऱ्यांचे सत्र कायम; एरंडोल येथे दागिने, रोकड चोरीला appeared first on पुढारी.
जळगाव: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरटे व घरात घोरपडी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पोलीस प्रशासनामध्ये दररोज अनेक मोटरसायकली चोर किंवा घरफोडीचे गुन्हे दाखल होत आहेत. एरंडोल येथे ४ लाख ८८ हजार ६४२ रुपये तर पाचोरा येथे ५९ हजार रुपयांचे सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडेल येथील …
The post जळगाव : चोऱ्यांचे सत्र कायम; एरंडोल येथे दागिने, रोकड चोरीला appeared first on पुढारी.