भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाने दिल्या शुभेच्छा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचे आईकडील आजोळ हे नागपूरचं आहे. रोहितच्या आईचे वडील हे मध्य रेल्वेत नागपुरात कार्यरत होते. रोहितचा जन्म हा नागपुरात एका खासगी रुग्णालयात झाला. मुंबईला असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो आपल्या मामा-मामीकडे राहायला येत असे. रोहितची मामी ज्योती अय्यर, त्याचे मामा धनंजय अय्यर, प्रिती शर्मा, अंजू अय्यर … The post भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाने दिल्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाने दिल्या शुभेच्छा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचे आईकडील आजोळ हे नागपूरचं आहे. रोहितच्या आईचे वडील हे मध्य रेल्वेत नागपुरात कार्यरत होते. रोहितचा जन्म हा नागपुरात एका खासगी रुग्णालयात झाला. मुंबईला असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो आपल्या मामा-मामीकडे राहायला येत असे. रोहितची मामी ज्योती अय्यर, त्याचे मामा धनंजय अय्यर, प्रिती शर्मा, अंजू अय्यर या सर्वांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली. (India vs Australia)
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तब्बल एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हा सामना खेळवला जात आहे. रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमला नागपुरकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांकडून रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा देण्यात आल्या. भारताच्या विजयासाठी नागपुरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम झाले. भारताच्या विश्वविजयासाठी सर्वांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे.
वर्ल्डकप विजयासाठी महायज्ञ
भारताने वर्ल्ड कप फायनलमध्ये जिंकावा यासाठी नागपुरातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आज पुन्हा एकदा भारताच्या विजयानंतर नागपूरकर फटाक्यांच्या आतषबाजीसह दिवाळी साजरी करणार आहेत. भारतीय संघाची फलंदाजी सुरू होताच रस्त्यावर वर्दळ कमी झाली. अनेक ठिकाणी होमहवन झाले. बर्डी येथील राधाकृष्ण मंदिरात महायज्ञ करण्यात आला. या यज्ञातून भारतीय क्रिकेट संघ विजयी व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. पूर्व नागपुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो, हातात तिरंगा घेऊन हनुमान मंदिरात महाआरती केली.
हेही वाचा : 

ऑस्‍ट्रेलियाच्‍या ‘या’ पाच खेळाडूंचे भारतासमाेर असेल माेठे आव्‍हान
टीम इंडिया ‘विजयी भवः’, देशभरात प्रार्थना अन्‌ होमहवन
कोण होणार जगज्जेता? आज विश्वचषकाचा अंतिम महासंग्राम

 
The post भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाने दिल्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचे आईकडील आजोळ हे नागपूरचं आहे. रोहितच्या आईचे वडील हे मध्य रेल्वेत नागपुरात कार्यरत होते. रोहितचा जन्म हा नागपुरात एका खासगी रुग्णालयात झाला. मुंबईला असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो आपल्या मामा-मामीकडे राहायला येत असे. रोहितची मामी ज्योती अय्यर, त्याचे मामा धनंजय अय्यर, प्रिती शर्मा, अंजू अय्यर …

The post भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाने दिल्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

Go to Source