बेक्ड कॉर्न टोस्ट खायचाय! जाणून घ्या रेसिपी
साहित्य :
5 पीस ब्रेड, 1 वाटी उकडलेल्या कणसाचे दाणे, अर्धा कप बारीक चिरलेला कांंदा, 1 लहान सिमला मिरची बारीक चिरलेली, 1 मोठा चमचा मैदा, 1 ग्लास दूध, 1 लहान चमचा मीठ, मिरेपूड 1/2 लहान चमचा, 1 क्यूब चीज.
कृती :
सर्वप्रथम बे्रड टोस्टरमध्ये थोडासा भाजून घ्यावा. कढईत लोणी आणि मैदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा, सिमला मिरची घालून 1 मिनिट भाजून घ्यावे. दूध घालून हलवत राहावे.
घट्ट होत आल्यावर त्यात कणसाचे दाणे, मीठ, काळेमिरे पूड घालून एकजीव करावे आणि कढई गॅसवरून खाली उतरून घ्यावी. मिश्रण गार झाल्यावर टोस्ट केलेल्या ब्रेडवर एक मोठा चमचा हे मिश्रण पसरवून वर चीजचा किस करून त्यावर घालावे. ओव्हनमध्ये 100 डिग्री सेंटिग्रेड वर10-12 मिनिटे बेक करून बेक्ड कॉर्न टोस्ट सर्व्ह करावे.
The post बेक्ड कॉर्न टोस्ट खायचाय! जाणून घ्या रेसिपी appeared first on पुढारी.
साहित्य : 5 पीस ब्रेड, 1 वाटी उकडलेल्या कणसाचे दाणे, अर्धा कप बारीक चिरलेला कांंदा, 1 लहान सिमला मिरची बारीक चिरलेली, 1 मोठा चमचा मैदा, 1 ग्लास दूध, 1 लहान चमचा मीठ, मिरेपूड 1/2 लहान चमचा, 1 क्यूब चीज. कृती : सर्वप्रथम बे्रड टोस्टरमध्ये थोडासा भाजून घ्यावा. कढईत लोणी आणि मैदा घालून परतून घ्यावा. नंतर …
The post बेक्ड कॉर्न टोस्ट खायचाय! जाणून घ्या रेसिपी appeared first on पुढारी.