Dhangar Reservation : अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलिस बंदोबस्त
बारामती : पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदारांच्या घरापुढे धनगर समाजाकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून बारामतीत चंद्रकांत वाघमोडे हे उपोषणाला बसले आहेत. आजचा उपोषणाचा अकरावा दिवस आहे. सरकारने चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज पासून महाराष्ट्रातील 288 तर 48 खासदारांच्या दारात शांततेच्या मार्गाने बसण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांना केल्या आहेत.
आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थाना बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा
Pune News : जनता दरबारात महिलांनी वाचले समस्यांचे पाढे
Maratha Reservation : कालमर्यादा स्पष्टीकरणास मागासवर्ग आयोगाची असमर्थता
Pune News : पीएमपी चालकाला सिग्नल तोडणे भोवले
The post Dhangar Reservation : अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलिस बंदोबस्त appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदारांच्या घरापुढे धनगर समाजाकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून बारामतीत चंद्रकांत वाघमोडे हे उपोषणाला बसले आहेत. आजचा उपोषणाचा अकरावा दिवस आहे. सरकारने चंद्रकांत …
The post Dhangar Reservation : अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलिस बंदोबस्त appeared first on पुढारी.