पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त

पिंपळनेर:(जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा : येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास बेंगलुरु येथील नॅक संस्थेकडून नुकतीच’बी’श्रेणी प्राप्त झाली आहे. दि. 3 व 4 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या तृतीय फेरीच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रा. डॉ.बलविंदर सिंग (प्रोफेसरगुरुनानक देव युनिव्हर्सिटी,अमृतसर, पंजाब), प्रा.डॉ.प्रदीपसिंग चुंदावत (प्रोफेसर, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, वडोदरा, गुजरात) तसेच प्राचार्य डॉ. महावीर कोठाले (कला, वाणिज्य … The post पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त appeared first on पुढारी.
पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त

पिंपळनेर:(जि.धुळे)Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास बेंगलुरु येथील नॅक संस्थेकडून नुकतीच’बी’श्रेणी प्राप्त झाली आहे.
दि. 3 व 4 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या तृतीय फेरीच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रा. डॉ.बलविंदर सिंग (प्रोफेसरगुरुनानक देव युनिव्हर्सिटी,अमृतसर, पंजाब), प्रा.डॉ.प्रदीपसिंग चुंदावत (प्रोफेसर, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, वडोदरा, गुजरात) तसेच प्राचार्य डॉ. महावीर कोठाले (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बेळगाव, कर्नाटक) या तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील पाच वर्षाच्या स्थिती-गतीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्यात. त्याचप्रमाणे आजी, माजी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. या दोन दिवसीय भेटीचा अहवाल नॅक संस्थेला सुपूर्द केल्यानंतर महाविद्यालयास पुनश्च एकदा’बी’श्रेणीचे मानांकन मिळाले. या यशाबद्दल पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब आर.एन. शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्रराव विनायकराव मराठे व सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी.कदम व आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. डॉ.संजय खोडके व सर्व आजी-माजी सहकारी प्राध्यापकप्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Latest Marathi News पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त Brought to You By : Bharat Live News Media.