Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) स्टारर ‘अॅनिमल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरात ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अॅनिमलच्या यशानंतर रणबीरचा भाव चांगलाच वधारला आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ चा विजेता कोण होणार? ड्रामा क्विन राखीनं केली भविष्यवाणी (video)
Rakhi Sawant : राखी सावंतला अटकेपासून दिलासा, आदिल दुर्रानी लिक व्हिडिओ प्रकरण
Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर
आता रणबीरच्या ( Ranbir Kapoor ) कारकिर्दीला चांगलीच भरारी मिळाली आहे. त्यामुळे त्याने आपल्या मानधनात वाढ केली असल्याची माहिती समोर आली आहे. रणबीरने त्याच्या मानधनात दुपटीहून जास्त वाढ केली आहे. ‘अॅनिमल’ च्या यशानंतर रणबीरच्या लोकप्रियेतत वाढ झाली आहे. रणबीरने त्याचे मानधन ३० कोटी रुपयांवरून वाढवून ६५ कोटींच्या जवळपास केले आहे; मात्र याला रणबीरने अद्याप दुजोरा दिलेला नाही, असे सांगितले जात आहे.
मानधनवाढीबाबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडेही अद्याप काहीच माहिती नाही. यापूर्वीही रणबीरने ‘संजू’ या सिनेमाच्या यशानंतर मानधनात वाढ केल्याचे समोर आले होते. त्यावेळी रणबीरने जाहिरातीसाठीचे मानधन ८ कोटींहून १२ कोटी केले होते.
View this post on Instagram
A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)
View this post on Instagram
A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)
Latest Marathi News ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला Brought to You By : Bharat Live News Media.