मिलिंद देवरांवर बाळासाहेब थाेरांताचा निशाणा,”आपले वडील…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात ते रीतसर प्रवेश करणार आहेत. देवरा यांच्या भूमिकेनंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पोस्ट करत  मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी … The post मिलिंद देवरांवर बाळासाहेब थाेरांताचा निशाणा,”आपले वडील…” appeared first on पुढारी.
मिलिंद देवरांवर बाळासाहेब थाेरांताचा निशाणा,”आपले वडील…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात ते रीतसर प्रवेश करणार आहेत. देवरा यांच्या भूमिकेनंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पोस्ट करत  मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांनाही आवडला नसेल.” (Milind Deora)
Milind Deora : अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न

मिलिंद देवरा यांच्या राजकीय भूमिकेनंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल. “

मिलिंद देवरांचे ट्विट
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज एक्स पोस्ट करून याबाबत माहिती दिली. “आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे.
देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत,…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 14, 2024

हेही वाचा 

Lok Sabha elections 2024 : राजू शेट्टींना हातकणंगले लोकसभा जागा शरद पवार गटाच्या कोट्यातून मिळणार
Rohit Patil : तासगावात रोहित पाटील यांची जल्लोषात मिरवणूक; एमआयडीसी मंजूरीनंतर कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव
काम झालंय.. मास्टरमाइंडला कळवा; आरोपींचा फोन

 

Latest Marathi News मिलिंद देवरांवर बाळासाहेब थाेरांताचा निशाणा,”आपले वडील…” Brought to You By : Bharat Live News Media.