10 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक विभागात खांदेपालट सुरू

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील सुमारे 88 अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 13 पोलिस निरीक्षकांच्या विभागांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यातील दहा अधिकार्‍यांची अन्य जिल्ह्यात बदली झाली असून, तीन अधिकार्‍यांना जिल्ह्यातच साईट ब्राँच मिळाली आहे. अन्य 75 अधिकार्‍यांच्या बदल … The post 10 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक विभागात खांदेपालट सुरू appeared first on पुढारी.

10 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक विभागात खांदेपालट सुरू

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील सुमारे 88 अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 13 पोलिस निरीक्षकांच्या विभागांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यातील दहा अधिकार्‍यांची अन्य जिल्ह्यात बदली झाली असून, तीन अधिकार्‍यांना जिल्ह्यातच साईट ब्राँच मिळाली आहे. अन्य 75 अधिकार्‍यांच्या बदल येत्या-दोन तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
काही दिवसांत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे बदल्यांना सुरूवात झाली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी विभागातील निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून दहा अधिकारी दुसर्‍या जिल्ह्यात गेले तर, दहा अधिकारी नव्याने नगर जिल्ह्यात आले आहेत. अद्यापि 75 अधिकार्‍यांची बदल्या होणे बाकी आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यातही पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्यात उपविभाग बदलून होण्याची शक्यता आहे.
कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची धुळे तर, तोफखान्याचे मधुकर साळवे यांची जवळगाव येथे बदली झाली आहे. यांच्यासह आठ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पारनेर पोलिस ठाण्याचे संभाजी गायकवाड, अकोलेचे विजय करे यांची अकार्यकारी पदावर (साईट ब्राँच) बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशात म्हटले आहे.
बदली पात्र अधिकारी व निकष
जिल्ह्यातून 35 पोलिस निरीक्षक बदलीस पात्र होते. त्यापैकी 13 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. अजून 36 सहायक पोलिस निरीक्षक व 37 पोलिस उपनिरीक्षक असे एकूण 75 अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. एकाच जिल्ह्याती तीन वर्षे सेवाकाळ, स्वतःच्या जिल्ह्यात नेमणूक असणे आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असणे असे निकष लावण्यात आले आहेत.
जिल्ह्याबाहेर गेलेले अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण)
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण (नंदूबार), घनश्याम बळप(नाशिक ग्रामीण), मधुकर साळवे (जळगाव), हर्षवर्धन गवळी(धुळे), वासुदेव देसले (नंदूरबार), चंद्रशेखर यादव (धुळे), संजय सानप (नाशिक ग्रामीण), सोपान शिरसाठ (नाशिक ग्रामीण), शिवाजी डोईफोडे (नाशिक ग्रामीण).
जिल्ह्याबाहेरून आलेले अधिकारी
खगेंद्र टेभेंकर (नाशिक ग्रामीण), संदीप कोळी (नाशिक ग्रामीण), समीर बारवकर (नाशिक ग्रामीण), समाधान नागरे (नाशिक ग्रामीण), रामकृष्ण कुंभार (जळगाव), नितीन देशमुख (धुळे), आनंद कोकरे (धुळे) सतीश घोटेकर (धुळे), सोपान काकड (नाशिक ग्रामीण).
हेही वाचा

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप घाबरले : नाना पटोले
भाटघर, निरा देवघरमधील विसर्ग बंद करा : आमदार संग्राम थोपटे
दूषित हवामानाचा कांदा पिकाला फटका : शेतकर्‍यांवर संकट

Latest Marathi News 10 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक विभागात खांदेपालट सुरू Brought to You By : Bharat Live News Media.