भंडारा: महिला पोलिसाला अश्लील शिवीगाळ; लाखांदूर सभापतीच्या पतीविरोधात गुन्हा

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दिघोरी पोलिस स्टेशन मध्ये घडली. याप्रकरणी फिर्यादी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय यशवंत वरकडे (वय ४६, … The post भंडारा: महिला पोलिसाला अश्लील शिवीगाळ; लाखांदूर सभापतीच्या पतीविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

भंडारा: महिला पोलिसाला अश्लील शिवीगाळ; लाखांदूर सभापतीच्या पतीविरोधात गुन्हा

भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दिघोरी पोलिस स्टेशन मध्ये घडली. याप्रकरणी फिर्यादी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय यशवंत वरकडे (वय ४६, रा. दिघोरी, ता. लाखांदूर) असे संशयिताचे नाव आहे. संजय वरकडे हे लाखांदूर पंचायत समिती सभापती संजना वरकडे यांचे पती होत. Bhandara News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री ९ .३० च्या सुमारास महिला पोलिस कर्मचारी डायरी अंमलदार म्हणून कर्तव्य बजावित होत्या. यावेळी संजय वरकडे हे दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्ये आले. आणि मी पांलदुर वरून येत असताना पोलिसांनी माझा फोटो का काढला? अशी विचारणा करीत माझी बायको सभापती आहे. माझा रिपोर्ट घे, असे सांगून महिला पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. Bhandara News
त्यावर, महिला कर्मचाऱ्याने आरोपीस शिव्या देऊ नका, आरामात बोला, असे म्हटले असता संजयने महिला पोलिसाचे शोल्डर पकडून ढकलून देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला . व माझी बायको सभापती आहे, तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी संजयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नंदेश्वर करीत आहेत.
हेही वाचा 

भाजप मोठा पक्ष पण भंडारा माझा गृहजिल्हा! : प्रफुल्ल पटेल
नागपूर : प्रफुल्ल पटेल म्हणतात भाजप मोठा पक्ष, पण भंडारा माझा गृहजिल्हा !
भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा : अजित पवार

Latest Marathi News भंडारा: महिला पोलिसाला अश्लील शिवीगाळ; लाखांदूर सभापतीच्या पतीविरोधात गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.