ठाणे : मुंब्र्यात स्लॅब कोसळून ४ जण जखमी
ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : इमारतीमधील सदनिकेचा स्लॅब कोसळून चार रहिवासी जखमी झाल्याची घटना आज (दि.१२) दुपारी मुंब्रा परिसरात घडली. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावरील सदनिकेमध्ये कोसळला. सदरची इमारत १६ वर्ष जुनी असून इमारतीमधील दोन्ही सदनिका पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सील करण्यात आल्या आहेत.
मुंब्र्यातील ठाकूरपाडा परिसरात सदफ अपार्टमेंट ही तळ अधिक चार मजल्यांची १६ वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण ३० सदनिका असून २ टेरेस फ्लॅट आणि २ दुकानांचे गाळे आहेत. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार, या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २०१ या रूमच्या स्लॅबचा काही भाग पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०१ मध्ये पडला. यामध्ये सलमा मिरजा (वय ३८) यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. अन्सारी सलेहा (वय २३), अन्सारी नुमान (वय २३) या दोघांच्या डोक्याला दुखापत झाली. तर रुबिना शेख (वय २२ ) या करकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
हेही वाचा
ठाणे : खडी यंत्रामध्ये पडून कामगाराचा मृत्यू
ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी आणखी ३ जणांना अटक
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेव्ह पार्ट्या : विजय वडेट्टीवार
Latest Marathi News ठाणे : मुंब्र्यात स्लॅब कोसळून ४ जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.