दवाखाने भरले रुग्णांनी खचाखच

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसामुळे रस्त्यावर, गल्ली बोळात पाण्याचे डबळे साचते. त्यामुळे थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. बोधेगावात जवळपास लहान-मोठे 15 दवाखाने व ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी उपचारासाठी खाटा शिल्लक नसल्याने जमिनीवर सलाईन घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. परिसरातील … The post दवाखाने भरले रुग्णांनी खचाखच appeared first on पुढारी.

दवाखाने भरले रुग्णांनी खचाखच

बोधेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसामुळे रस्त्यावर, गल्ली बोळात पाण्याचे डबळे साचते. त्यामुळे थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.
बोधेगावात जवळपास लहान-मोठे 15 दवाखाने व ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी उपचारासाठी खाटा शिल्लक नसल्याने जमिनीवर सलाईन घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. परिसरातील 26-27 गावे व शेजारील गेवराई तालुकयातील 15-20 गावांतील रुग्णांना बोधेगावात उपचारासाठी यावे लागते. त्यामुळे सर्वच दवाखान्यांत रुग्णांची गर्दी झाली आहे. रात्री उशिरापर्यंत दवाखाने सुरू असतात. व्हायरल इन्फेक्शनबरोबर मलेरिया, डेंग्यू, काविळ, गोचिड ताप इत्यादी आजाराचे रुग्ण आढळत असल्याचे डॉ. चंद्रशेखर घनवट यांनी सांगितले.
व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णाला किमान पाच दिवस उपचार द्यावा लागतो. ताप आणि सर्दीने छातीत कफ तयार होतो. वेळीच उपचार घेतला नाही, तर फुप्फुसाचा संसर्ग होऊन निमोनिया होऊ शकतो. खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी एका रुग्णाला किमान पाचशे रुपये खर्च येतो. अख्खे कुटुंबच या व्हायरल इन्फेशनच्या साथीला बळी पडताना दिसत आहे. चालू वर्षी पावसाने दगा दिल्याने कपाशीसारखे नगदी पीक हातातून गेले. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामाची सुद्धा तीच गत झाली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या मजुरांच्या हाताला काम नाही. दुकानदारांना ग्राहक नाही. सगळेच आर्थिक अडचणीत असताना व्हायरल इन्फेक्शनचे अस्मानी संकट आले आहे.
आरोग्य कर्मचार्‍यांच्या रजा रद्द
बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे रुग्णांवर मोफत उपचार केला जातात. वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत मोराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी व डॉ. दिनेश जाधव व आरोग्य कर्मचारी अशी 20 कर्मचारी दिवस रात्र रुग्णालयात थांबून रुग्णांवर उपचार करीत आहेत. वैद्यकीय अधीक्षकांनी सर्व कर्मचार्‍यांच्या रजा रद्द केल्या असून, सर्व कर्मचार्‍यांनी मुख्यालयी थांबण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण रुग्णालयात सर्व उपचार मोफत आहेत. सर्व औषधे उपलब्ध आहेत. तसेच रक्त, लघवी तपासणी मोफत आहेत. कोणत्याच रुग्णाकडून एक रुपयाही घेतला जात नाही. त्यामुळे साथीच्या आजारांची लक्षणे दिसून आल्यास लगेच रुग्णालयात यावे. आमची यंत्रणा तुमच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे.
                    – डॉ. श्रीकांत मोराळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, बोधेगाव
Latest Marathi News दवाखाने भरले रुग्णांनी खचाखच Brought to You By : Bharat Live News Media.