मध्यमवर्गाचे घराचे स्वप्न साकारणार! मोदी सरकारची गृहकर्जावर सबसिडीची योजना लवकरच

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardeep Singh Puri : केंद्र सरकार गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देण्यासाठी नवीन योजना लागू करत आहे. याचा लाभ वार्षिक २ लाख ते ७ लाख उत्पन्न असलेल्यांसाठी होणार आहे. ही योजना लागू करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३च्या स्वातंत्र्य … The post मध्यमवर्गाचे घराचे स्वप्न साकारणार! मोदी सरकारची गृहकर्जावर सबसिडीची योजना लवकरच appeared first on पुढारी.

मध्यमवर्गाचे घराचे स्वप्न साकारणार! मोदी सरकारची गृहकर्जावर सबसिडीची योजना लवकरच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Hardeep Singh Puri : केंद्र सरकार गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देण्यासाठी नवीन योजना लागू करत आहे. याचा लाभ वार्षिक २ लाख ते ७ लाख उत्पन्न असलेल्यांसाठी होणार आहे. ही योजना लागू करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३च्या स्वातंत्र्य दिनी गृहकर्जावर सबसिडी देण्यासाठी नवी योजना आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहनिर्माण आणि नगररचना विभागाने या योजनेवर काम सुरू केले होते. या योजनेवर बरेच काम करावे लागले, ही योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ही योजना कॅबिनेटच्या बैठकीत मांडली जाईल, असे पुरी यांनी सांगितले. ()
Credit Linked Subsidy Scheme (CLSS) ही योजना बंद करण्यात आली आहे. याची जागा नवी योजना घेईल. CLSS ही योजना २०१५ला सुरू करण्यात आली होती, पण ती मार्च २०२१मध्ये बंद करण्यात आली. या योजनेत २३ लाख ९७ हजार घरांनी लाभ घेतला. (Hardeep Singh Puri)
शहरात जे लोक भाड्याने राहातात, किंवा चाळीत, झोपडीत राहातात त्यांना नवी योजना लाभदायक ठरेल. शहरी लोकांना व्याज आणि हप्ते यातून दिलासा देणारी ही योजना असणार आहे.
Latest Marathi News मध्यमवर्गाचे घराचे स्वप्न साकारणार! मोदी सरकारची गृहकर्जावर सबसिडीची योजना लवकरच Brought to You By : Bharat Live News Media.