फायनलच्या पूर्वसंध्येला रोहित-कमिन्सचे फोटाेशूट
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक 2023 अंतिम सामना रविवार दि. १९ नाेव्हेंबर राेजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी फोटो सेशन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांनी अहमदाबादमधील ऐतिहासिक वारसास्थळावर ट्रॉफीसोबत छायाचित्रे काढली. (IND vs AUS WC Final)
विश्वचषकावर आपल्या नावाची माेहर काेणता संघ उमटविणार याचा निर्णय रविवारी (दि.19) होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियाने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमने-सामने येणार आहेत. 2003 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
अहमदाबादमधील ‘अडालज की बावडी’मध्ये फाेटाे शुट
रोहित आणि कमिन्सने अहमदाबादमधील अडालज स्टेपवेल किंवा अडालज की बावडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी स्पेशल फोटोशूट केले. राणी रुदादेवी यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती. वाघेला राज्याचा प्रमुख वीरसिंहाची त्या पत्नी हाेत्या. त्यावेळी हा परिसर दांडाई देश म्हणून ओळखला जात असे. त्याच्या साम्राज्यात नेहमीच पाण्याची टंचाई असायची. यामुळे तेथील नागरिकांना पावसावर अवलंबून राहावे लागत असे. (IND vs AUS WC Final) स्टेपवेलच्या आतील तापमान नेहमी बाहेरील तापमानापेक्षा सहा अंश कमी असते. राणा वीर सिंह यांनी आपल्या प्रजेच्या सोयीसाठी या विहिरीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, मध्येच सुलतान बेघराने राणा वीर सिंगच्या राज्यावर हल्ला केला आणि या लढाईत राणा वीर सिंग यांना वीरमरण आले हाेते.
सुलतान बेघराने राणी रुदादेवी यांच्या सौंदर्याने आकर्षित होऊन लग्नाचा प्रस्ताव पाठवला. त्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याची अट घातली. सुलतानने पायरी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले, यानंतर त्यांनी त्याच विहिरीत उडी मारून आपल्या प्राणाची आहुती दिली हाेती. अडालज पायरी विहिरीचा इतिहास जरी दु:खाचा असला तरी या पायरी विहिरीने जलव्यवस्थापनात अतुलनीय योगदान दिले आहे. असे मानले जाते की, गावकरी येथे पाणी नेण्यासाठी करण्यासाठी आणि देवी-देवतांची पूजा करण्यासाठी येत असत. या पायरीच्या शेजारी त्या मजुरांच्या कबरी आहेत ज्यांची सुलतानने पायरी विहीर बांधल्यानंतर हत्या केली होती. अशी अप्रतिम पायरी विहीर इतर कोठेही बांधली जावू नये, असा त्याचा आग्रह हाेता.
View this post on Instagram
A post shared by ICC (@icc)
हेही वाचा :
Greg Chappell : क्रिकेट विश्वचषक कोण जिंकणार? चॅपल गुरूजी म्हणाले…
IND vs AUS final pitch report : फायनल सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी असेल? :
Mohammed Shami : शमीचे नाव घेताच आई अंजुम झाल्या भावूक, म्हणाल्या, “विश्वचषक ट्राफी…”
The post फायनलच्या पूर्वसंध्येला रोहित-कमिन्सचे फोटाेशूट appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक 2023 अंतिम सामना रविवार दि. १९ नाेव्हेंबर राेजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी फोटो सेशन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांनी अहमदाबादमधील ऐतिहासिक वारसास्थळावर ट्रॉफीसोबत छायाचित्रे काढली. (IND vs AUS WC Final) विश्वचषकावर आपल्या नावाची माेहर काेणता संघ …
The post फायनलच्या पूर्वसंध्येला रोहित-कमिन्सचे फोटाेशूट appeared first on पुढारी.