सर्व्हन्टस ऑफ इंडिया प्रकरण : कुलगुरू डॉ. रानडे यांची तत्काळ दिल्लीकडे धाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी अंतर्गत येणार्‍या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची पात्रता नसताना कुलगुरूपदी नेमल्याची तक्रार झाली. त्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच हादरून गेलेले डॉ. रानडे यांनी गुरुवारी (दि.11) रात्री दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे धाव घेतल्याचे समजते. दरम्यान, पुढारीने अध्यक्ष दामोदर साहु यांच्याशी संपर्क साधला असता ते … The post सर्व्हन्टस ऑफ इंडिया प्रकरण : कुलगुरू डॉ. रानडे यांची तत्काळ दिल्लीकडे धाव appeared first on पुढारी.

सर्व्हन्टस ऑफ इंडिया प्रकरण : कुलगुरू डॉ. रानडे यांची तत्काळ दिल्लीकडे धाव

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी अंतर्गत येणार्‍या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची पात्रता नसताना कुलगुरूपदी नेमल्याची तक्रार झाली. त्याचे वृत्त दैनिक ‘Bharat Live News Media’त प्रसिद्ध होताच हादरून गेलेले डॉ. रानडे यांनी गुरुवारी (दि.11) रात्री दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे धाव घेतल्याचे समजते. दरम्यान, Bharat Live News Mediaने अध्यक्ष दामोदर साहु यांच्याशी संपर्क साधला असता ते व्यथित स्वरात म्हणाले, कुलगुरूंनी पुढे येऊन बोलायला हवे.
प्रा. मुरलीकृष्णा यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची पात्रता नसताना निवड केल्याची लेखी तक्रार विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली व त्याचे वृत्त दैनिक Bharat Live News Mediaनेही प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून हादरलेले कुलगुरू डॉ. रानडे हे गुरुवारी तत्काळ दिल्लीकडे निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अडचणी वाढल्याने दिल्लीत धाव…
सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या अंतर्गत येणरी गोखले इन्स्टिटयूट ही स्था हे देशातील प्रतिष्ठीत व नावाजलेली संस्था आहे.मात्र तेथे सुरु असलेल्या भ्रष्टकारभाराचे पुरावे संस्थेतील कर्मचार्यांनीच उघड केल्याने संस्थेतील वरिष्ठ पदाधिकारी व साक्षात कुलगुरु अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सचिव मिलिंद देशमुख स्वतःच्या मुलाला संस्थेचे आजीवन सदस्य करून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच वकील असल्याने बहिणीला देखिल संस्थेत सल्लागार पदावर घेतले आहे.
पुण्यात आल्यावर सर्वकाही बोलणार
या सर्व प्रकारणाबाबत सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष दामोदार साहू यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता ते म्हणाले, मी ओडिशा राज्यातील कटक शहरात राहतो. पुण्यात गेली 49 वर्षे येतो आहे. नामदार गोखले यांचे नाव खूप मोठे आहे.त्यांच्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे याचा अभिमान आहे. पण वर्तमानपत्रातील बातम्यांनी मी व्यथीत झालो आहे.माझे वय आता 81 आहे. मी 49 वर्षापासून संस्थेत आहे.तेव्हा दिग्गज मंडळी संस्थेत होती. मी या वयात भ्रष्टाचार करेन का? तुम्ही आडिशात या संस्थेचे काम तुम्हाला दाखवतो. कुलगुरु रानडे व सचिव मिलिंद देशमुख यांच्या बाबतच्या बातम्या मी रोज वाचतो आहे. मी आता थकलोय.
एकदा पुण्यात येणार आहे.तेव्हा सर्वकाही बोलणार आहे.कुलगुरु रानडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलायला हवे त्यांना त्या बाबत मी सांगणार आहे.
साहूंना दिले प्रलोभन…
अध्यक्ष दामोदर साहू यांनी या सर्व नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करावे आणि त्या मोबदल्यात पात्रता नसणारा त्यांचा मुलगा शेखर साहू याला आजीवन सदस्य करण्याची अट घातली.त्यावर हरकत घेऊ नये म्हणून प्रेमकृष्ण द्विवेदी यांच्या नातवाला कोरम नसताना ठराव घेऊन सदस्य करण्याचा घाट घातला.मात्र त्याचवेळी आत्मानन्द मिश्रा यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करा म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली.
प्रकरण नस्ती बंद करण्यात रानडेंचा पुढाकार
डॉ. रानडे यांनी धर्मदाय आयुक्त यांच्या मदतीने मिश्रा यांच्या प्रकरणाला जुलै 2023 मध्ये नस्ती बंद करण्याबाबत समझोता केला. त्याबदल्यात अमरेश तिवारी यांच्या मुलाला संस्थेच्या कर्मचारी म्हणून नोव्हेंबर 2023 रोजी संस्थेचा ठराव न घेता रुजू केले. यासर्व घटना घडत असताना डॉ. रानडे हे कुलगुरू साठी पात्र नसल्याचे प्रकरण व पैश्याचे गैरव्यवहार उजेडात आले.
कुलगुरू बोलतच नाहीत
या प्रकरणावर गोखले संस्थेचे कुलगुरु डॉ.अजित रानडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भेटण्यास वारंवार टाळले.त्यामुळे या प्रकरणात त्यांची बाजू समजली नाही ते वारंवार कुलसचिव व जनसंपर्क अधिकारी यांना पुढे करीत आहेत.त्यामुळे थेट संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहु यांच्याशी संपर्क केला मात्र वयोवृध्द झाल्याने त्यांना या बाबत फार काही सांगता आले नाही.
हेही वाचा

Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ 3 फेब्रुवारीला
नाशिक कुंभनगरीत पंतप्रधान मोदींचे आगमन
राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर

Latest Marathi News सर्व्हन्टस ऑफ इंडिया प्रकरण : कुलगुरू डॉ. रानडे यांची तत्काळ दिल्लीकडे धाव Brought to You By : Bharat Live News Media.