नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शानदार रोड शो

नाशिक : नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले असून नाशिककरांनी मोठ्या उत्सवात त्यांचे स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. फुलांची उधळण करत ढोलताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत नाशिककरांनी केले. हॉटेल मिर्ची येथील हेलिपॅड ते सभास्थळ असा साधारण दोन किलोमीटरचा त्यांचा शानदार रोड शो होत आहे. या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने पंतप्रधानांसाठी … The post नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शानदार रोड शो appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शानदार रोड शो

नाशिक : नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले असून नाशिककरांनी मोठ्या उत्सवात त्यांचे स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. फुलांची उधळण करत ढोलताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत नाशिककरांनी केले.
हॉटेल मिर्ची येथील हेलिपॅड ते सभास्थळ असा साधारण दोन किलोमीटरचा त्यांचा शानदार रोड शो होत आहे. या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने पंतप्रधानांसाठी सुरक्षा असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या वाहनांमध्ये पंतप्रधान मोदी असलेले वाहन आहे. रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग केलेली आहे. बॅरिकेडिंगबाहेर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सामान्य नागरिक यांनी मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील आहेत.
 

Latest Marathi News नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शानदार रोड शो Brought to You By : Bharat Live News Media.