जळगाव : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयासाठी 14 तारखेला महामेळावा

जळगाव-  येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी भाजपा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट व इतर पक्षांची समन्वय समिती बनविण्यात आलेली आहे. या समन्वय समितीच्या माध्यमातून  निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पक्षातील नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा यासाठी (दि. 14) रोजी शहरात समन्वय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात … The post जळगाव : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयासाठी 14 तारखेला महामेळावा appeared first on पुढारी.

जळगाव : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयासाठी 14 तारखेला महामेळावा

जळगाव-  येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी भाजपा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट व इतर पक्षांची समन्वय समिती बनविण्यात आलेली आहे. या समन्वय समितीच्या माध्यमातून  निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पक्षातील नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा यासाठी (दि. 14) रोजी शहरात समन्वय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
राज्यामध्ये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर व त्याचा लागलेला निकालानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षातील प्रत्येक पक्षातील नेते येत्या काळातील निवडणुकांसाठी सज्ज झालेले आहेत. राज्यातील आघाडी सरकार मध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये समन्वय असावा यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर एक समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने शहरातील लाड वंजारी मंगल कार्यालयात दि. 14 रोजी सकाळी अकरा वाजता भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आरपीआय आठवले गट व इतर पक्षां चे प्रमुख  पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन, नामदार अनिल भाईदास पाटील, हे उपस्थित राहणार आहे व जिल्ह्यातील पक्षांचे समन्वयक बैठकीला उपस्थित राहतील असे पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेना शिंदे  गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील व भाजपा चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज याची  माहिती दिली.
यावेळी आमदार सुरेश भोळे , भाजपा जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे, उपजिल्हाप्रमुख भारती मस्के, अभिषेक पाटील महानगर अध्यक्ष भाजपा, उज्वला भेंडाळे, आरटीआय महानगर अध्यक्ष अनिल वन्य पद अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्याच्या समन्वयक समितीवर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी प्रथमच सामूहिक पत्रकार परिषद घेतली मात्र त्या पत्रकार परिषदेला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली.
जळगाव लोकसभेवर शिवसेनेने दावा केलेल्या असता भाजपाचे ज्ञानेश्वर जळकेकर महाराज म्हणाले की, प्रत्येक जण आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतो जळगाव लोकसभा ही भाजपाची जागा आहे. आणि ती भाजपाचीच राहील आम्हाला कोणत्याही गणिते मांडायची नाही किंवा दाखवायचे नाही. जागेची मागणी करणे ही लोकशाहीचा भाग आहे .प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडतो पक्षाचे नेते जो उमेदवार ठरवतील तोच उमेदवार राहील व त्यासाठी सर्व मिळून काम करू शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील म्हणाले.
Latest Marathi News जळगाव : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयासाठी 14 तारखेला महामेळावा Brought to You By : Bharat Live News Media.