स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मुख्यमंत्री म्हणाले…”

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Swachh Survekshan Awards 2023) … The post स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मुख्यमंत्री म्हणाले…” appeared first on पुढारी.
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मुख्यमंत्री म्हणाले…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Swachh Survekshan Awards 2023)
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला मिळालेल्या या यशाबद्दल राज्यातील जनता, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदान आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Swachh Survekshan Awards 2023)
स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे या यशासाठी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. (Swachh Survekshan Awards 2023)

केंद्र सरकारच्या #स्वच्छसर्वेक्षण – २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी राज्यातील जनतेचे,… pic.twitter.com/92OzxNaFbz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 11, 2024

केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांचा क्रमांक आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूरनं पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर महाराष्ट्रातील तीन शहरांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा:

Swachh Survekshan 2024 | स्वच्छ सर्वेक्षण यादीत महाराष्ट्रातील ‘नवी मुंबई’ शहर तिसऱ्या स्थानी
Swachh Survekshan 2022: सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने पटकावले तिसरे स्थान; पुणे पहिल्या दहातून बाहेर
`India’s cleanest city’ : स्वच्छ शहरात इंदूर नेहमीच कसे पहिले येते? जाणून घ्या कचरा व्यवस्थापनाचे तंत्र!

 
 
Latest Marathi News स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मुख्यमंत्री म्हणाले…” Brought to You By : Bharat Live News Media.