पाेलीस संपावर गेले, समाजकंटक पिसाटले..! पोर्ट मोर्सबीमध्‍ये १५ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी असलेल्या पोर्ट मोर्सबी या देशात दंगल उसळली असून दंगलीत आतापर्यंत १५ लोकांचा बळी गेला आहे. दंगली नियंत्रणात आणण्यासाठी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पगाराच्या मुद्यावर पोलिस संपावर गेल्याचे निमित्त साधत नागरिकांनीच लुटालूट केली आणि त्यातून ही दंगल उसळली. पोर्ट मोर्सबी … The post पाेलीस संपावर गेले, समाजकंटक पिसाटले..! पोर्ट मोर्सबीमध्‍ये १५ ठार appeared first on पुढारी.

पाेलीस संपावर गेले, समाजकंटक पिसाटले..! पोर्ट मोर्सबीमध्‍ये १५ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी असलेल्या पोर्ट मोर्सबी या देशात दंगल उसळली असून दंगलीत आतापर्यंत १५ लोकांचा बळी गेला आहे. दंगली नियंत्रणात आणण्यासाठी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पगाराच्या मुद्यावर पोलिस संपावर गेल्याचे निमित्त साधत नागरिकांनीच लुटालूट केली आणि त्यातून ही दंगल उसळली.
पोर्ट मोर्सबी येथे शॉपिंग मॉल्स लुटण्यात आली आणि वाहने पेटवण्यात आली. पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देशाला उद्देशून भाषण केले, त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे, पण दंगलखोरांवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे. बुधवारी सायंकाळी पोलिस कामावर रूज झाले तसेच लष्कराला पाचारण करण्यात आले, त्यानंतर दंगली नियंत्रणात आल्या. या दंगलीत पोर्ट मोर्सबी शहरात ८ लोकांचा मृत्यू झाला तर सिटी ऑफ लीमध्ये ७ लोकांचा बळी गेला आहे.
पोर्ट मोर्सबीचे राज्यपाल पॉवेस पार्ककॉप म्हणाले, “अशा प्रकारचा तणाव आम्ही शहरात कधी पाहिला नव्हता, तसेच आपल्या शहराच्या आणि देशाच्या इतिहसात असे कधीच घडले नव्हते. ज्यांनी लुटालूट केली ते संधीसाधू होते.”
दंगलींचे मूळ कारण | Papua New Guinea
पोलिस आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचा पगार बँकेत जमा होताच, ५० टक्के पगार कपात झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरू केली. पंतप्रधानांनी प्रशासकीय चुकीमुळे पगारकपात झाल्याचे सांगितले. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर दुसरीकडे सरकार आयकर वाढवत असल्याची अफवाही देशभरात पसरली.

VIDEO: Buildings burn and looters target shops around Papua New Guinea’s capital after a pay dispute involving the nation’s security forces sparked angry protests.
Soldiers, police officers and prison staff staged a lively but peaceful protest in the morning of January 10,… pic.twitter.com/VkYU6eNwVI
— AFP News Agency (@AFP) January 11, 2024

अशा पसरल्या दंगली | Papua New Guinea
शहरात पोलिस कार्यरत नाहीत, असे समजताच उपनगरातून अनेक लोक शहरात जमले आणि मॉलमध्ये आणि इतर दुकानांत लुटालूट सुरू केली. लुटालूट करणारे लोक बेरोजगार होते, असे काही बातम्यांत म्हटले आहे.
हेही वाचा

Maharashtra Assembly Winter Session 2023 : ‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; आव्हाड विधानसभेत नेमकं काय म्हणाले…
Manoj Jarange -Patil: सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील
Pusesavali Dangal : दंगलीत कुणाला मारताय? जातीला? धर्माला?? की माणसांना???

Latest Marathi News पाेलीस संपावर गेले, समाजकंटक पिसाटले..! पोर्ट मोर्सबीमध्‍ये १५ ठार Brought to You By : Bharat Live News Media.