पिंपळनेरला ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलन 

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निर्णयाविरुद्ध पिंपळनेर येथील ठाकरे गटातर्फे त्यांचा प्रतिकात्मक जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना धुळे जिल्हा संघटक किशोर आप्पा वाघ,पिंपळनेर तालुका संघटक अजय सूर्यवंशी, पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे,तालुका सहसंघटक तुषार गवळी, उपतालुकाप्रमुख मनोज खैरनार,शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ,शिव आरोग्य सेना सहसंघटक हिम्मत सोनवणे,पिंपळनेर उपशहरप्रमुख … The post पिंपळनेरला ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलन  appeared first on पुढारी.

पिंपळनेरला ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलन 

पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा- राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निर्णयाविरुद्ध पिंपळनेर येथील ठाकरे गटातर्फे त्यांचा प्रतिकात्मक जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना धुळे जिल्हा संघटक किशोर आप्पा वाघ,पिंपळनेर तालुका संघटक अजय सूर्यवंशी, पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे,तालुका सहसंघटक तुषार गवळी, उपतालुकाप्रमुख मनोज खैरनार,शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ,शिव आरोग्य सेना सहसंघटक हिम्मत सोनवणे,पिंपळनेर उपशहरप्रमुख बाबा शेख,युवा सेना उपशहर प्रमुख मयूर नांद्रे, शाखा प्रमुख स्वप्नील चित्ते, धमणार ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव,विभाग प्रमुख भगवान पगारे,वाणीदादा मावची,तानाजी कारंडे,निलेश बच्छाव,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी देशात लोकशाही टिकवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही. नार्वेकरांनी लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी लोकशाही पायदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर बसवत निकाल दिल्याची टीका आंदोलकांनी केली.
Latest Marathi News पिंपळनेरला ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलन  Brought to You By : Bharat Live News Media.