
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम्ही भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक पुन्हा उभारले आहे. आमच्या उदात्त प्रयत्नांच्या जोरावर हे केले आहे. ही एक प्रकारे संपूर्ण जगासाठी घोषणा आहे की, भारत स्वबळावर उभा आहे. आता संपूर्ण जग समृद्धी आणि शांततेसाठी पुढे जाईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यानंतर ते बोलत होते.
भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे भाग्याची गोष्ट
या वेळी मोहन भागवत म्हणाले की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. हा सोहळा देशाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य मजबूत करण्याची संधी आहे. इतक्या वर्षांनंतर आम्ही भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक पुन्हा उभारले आहे. ही एक प्रकारे संपूर्ण जगासाठी घोषणा आहे की, भारत स्वबळावर उभा आहे.” (Ram Mandir)
श्री राम हे संपूर्ण देशात मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. स्वातंत्र्यात अस्तित्त्वात असलेला स्वतःचा सन्मान आहे. प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला असून, त्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण अलौकिक बनले आहे. प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात उत्साह आहे. स्वबळावर उभा असलेला भारत आपल्या सन्माननीय जीवनाने संपूर्ण जगात समृद्धी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे जाईल, असेही भागवत यांनी नमूद केले. (Ram Mandir)
हेही वाचा :
राम मंदिरासाठी २४,००० किलोची घंटा; २ किमी अंतरापर्यंत घंटानाद
Ayodhya Cleanliness campaign : PM माेदींचा १४ जानेवारीपासून अयाेध्या ‘स्वच्छता’ मोहिम संकल्प
Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर! ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय
Latest Marathi News राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : सरसंघचालक म्हणाले, “भारत स्वबळावर…” Brought to You By : Bharat Live News Media.
