पुणे विभागातील 11 रेल्वे फाटके झाली कायमची बंद !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील 11 रेल्वे क्रॉसिंग फाटके आत्तापर्यंत कायमची बंद केली आहेत. या फाटकांऐवजी रेल्वे प्रशासनाने वाहनचालक आणि रेल्वे ट्रॅकजवळ राहणार्‍या स्थानिक नागरिकांसाठी रोड ओव्हर ब्रीज, रोड अंडर ब्रीज बांधून उपाय योजना केल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल 2023 पासून विभागातील 11 रेल्वे फाटके बंद करण्याची ही कार्यवाही केली. … The post पुणे विभागातील 11 रेल्वे फाटके झाली कायमची बंद ! appeared first on पुढारी.

पुणे विभागातील 11 रेल्वे फाटके झाली कायमची बंद !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील 11 रेल्वे क्रॉसिंग फाटके आत्तापर्यंत कायमची बंद केली आहेत. या फाटकांऐवजी रेल्वे प्रशासनाने वाहनचालक आणि रेल्वे ट्रॅकजवळ राहणार्‍या स्थानिक नागरिकांसाठी रोड ओव्हर ब्रीज, रोड अंडर ब्रीज बांधून उपाय योजना केल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल 2023 पासून विभागातील 11 रेल्वे फाटके बंद करण्याची ही कार्यवाही केली. त्यामुळे रेल्वे फाटकांवर होणारे अपघात कमी झाले असून, रेल्वे गाड्यांचा वेग वाढला आहे. तसेच, गाड्यांना होणारा उशीर देखील काही प्रमाणात कमी झाला आहे.
बंद झालेल्या फाटकांची नावे

पुणे- मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 8  दिनांक 3 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात आले.
पुणे- मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 117 दिनांक 2 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात आले.
पुणे-मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 108 आणि 81 तसेच
पुणे- दौंड दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 16 आणि मिरज- कोल्हापूर दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 20 हे डिसेंबर 2023 मध्ये बंद करण्यात आले आहेत.
पुणे- मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 130 हे ऑक्टोबर 2023 मध्ये बंद करण्यात आले.
पुणे- मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 23 हे सप्टेंबर 2023 मध्ये बंद करण्यात आले.
पुणे- दौंड दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 14 हे मे 2023 मध्ये बंद करण्यात आले.
पुणे- मिरज दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 28 आणि 70 हे एप्रिल 2023 मध्ये बंद करण्यात आली.

हेही वाचा

Pune News : पालिकेच्या चार्जिंग स्टेशनला अखेर मिळाला मुहूर्त
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड-शो होणार, पालकमंत्र्यांकडून मार्गाची पाहणी
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड-शो होणार, पालकमंत्र्यांकडून मार्गाची पाहणी

Latest Marathi News पुणे विभागातील 11 रेल्वे फाटके झाली कायमची बंद ! Brought to You By : Bharat Live News Media.