अहमदनगर : संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून राहूल नार्वेकर यांचा निषेध
संगमनेर; Bharat Live News Media वृत्तसेवा : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे आणि सर्व १६ आमदार हे पात्र असल्याचा निकाल आज (दि.१०) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याबाबत निषेध व्यक्त करीत आज (दि.१०) संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतप्त शिवसैनिक आज बस स्थानकासमोर एकत्र आले. आणि राहुल नार्वेकर यांचे बॅनर जाळत त्यांनी जोडे मारो आंदोलन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे १६ आमदार अपात्र की पात्र याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल देणार होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले होते. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालाबाबत संताप व्यक्त करत आज ठाकरे गटाच्या वतीने नार्वेकरांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संघटक कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकाजवळ सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांचे बॅनर जाळत जोडे मारो आंदोलन केले. आणि नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करत विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना संघटक पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख सुदर्शन इटप , शहरसंघटक समीर ओझा, उपतालुकाप्रमुख दत्तू नाईक, आजीज मोमीन, अमोल कवडे, योगेश बिचकर ,संकेत गुंजाळ राजेंद्र सातपुते, भैया तांबोळी उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून पुढची भूमिका जाहीर! म्हणाले, ‘आम्ही आता..’
Sanjay Raut : राहुल नार्वेकर यांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचून दाखविला : संजय राऊत
उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार
Latest Marathi News अहमदनगर : संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून राहूल नार्वेकर यांचा निषेध Brought to You By : Bharat Live News Media.