सांगली : शिवसेना पक्षाच्या निकालानंतर आमदार बाबर यांची प्रतिक्रिया
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षांनी आज दिलेल्या निकालाने खरी शिवसेना कोणाची ते जनतेला कळले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही कोणाची एकट्याची एकाधिकारशाही नाही आणि घराणेशाही देखील नाही हे आता सर्वांनाच समजले आहे.
निकालापूर्वी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असे सांगत ठाकरे गटाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील योग्य आणि चांगला निकाल लागला.शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे.यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
हिंदुत्वाची भूमिका आणि विकासकामांचा जोर लाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्याची ग्वाही आमदार बाबर यांनी दिली. आधीच्या सरकारच्या काळात विकास खुंटला होता. त्यासाठी कोरोनाचा मुद्दा उपस्थित केला जायचा.परंतु राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा ती भूमिका घेत आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या विकासाला मोठी गती मिळाली. पाणी सिंचन योजना, औद्योगिक प्रकल्प,रस्ते,नागरी सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने राज्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत.
आजचा निकाल लागल्यानंतर आम्ही जनतेच्या दारात जाऊ असे आणि सुप्रीम कोर्टात जाऊ असे ठाकरे गट म्हणतो.त्यांना कुठे जायचे ते त्यांचा निर्णय आहे.आम्हाला त्यामुळे काही फरक पडत नाही.त्यांनी जनतेच्या दारात जावे आणि आम्हीही जनतेच्या दारात जाऊ.जनतेला खरे कोण ते कळले आहे.जनता काय तो योग्य निर्णय घेईल.
आज निकाल असताना देखील आमदार बाबर विकासकामांच्या उदघाटनासाठी आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आले होते.याबाबत विचारले असता ते म्हणाले जनता नेहमीच माझ्याबरोबर आहे.त्यामुळे मला कोणतेच टेन्शन येत नाही.आजच्या निकालाने आम्हाला राम पावला आहे. साक्षात प्रभुरामचा आशीर्वाद लाभला आहे.
Latest Marathi News सांगली : शिवसेना पक्षाच्या निकालानंतर आमदार बाबर यांची प्रतिक्रिया Brought to You By : Bharat Live News Media.