उद्धव ठाकरेंकडून पुढची भूमिका जाहीर! म्हणाले, ‘आम्ही आता..’
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढची भूमिका काय असेल याबाबत माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी याआधी एक प्रतिक्रिया दिली आहे की न्याय देणाऱ्या व्यक्तीनेच आरोपीला भेट दिली. यातून काय सिद्ध होतं पहा. हा निकाल आम्हाला अपेक्षित होताच. ही मॅच फिक्सिंग होती. मूळ प्रश्न असा आहे की, त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाही. लोकशाहीच ही गळचेपी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते का हे पाहणार आहोत. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. आमदार अपात्र प्रकरणावर निकाल का दिला नाही?’, असा सवाल यावेळी त्यांनी केला.
Latest Marathi News उद्धव ठाकरेंकडून पुढची भूमिका जाहीर! म्हणाले, ‘आम्ही आता..’ Brought to You By : Bharat Live News Media.