अध्यक्षांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचला : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. गुजराती लॉबीने महाराष्ट्रातील मराठी जनतेची शिवसेना खत्म करण्याचे काम एका मराठी माणसाकडून केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिलेला निकाल दिल्लीवरून टाईप करून आला आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज … The post अध्यक्षांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचला : संजय राऊत appeared first on पुढारी.
अध्यक्षांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचला : संजय राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. गुजराती लॉबीने महाराष्ट्रातील मराठी जनतेची शिवसेना खत्म करण्याचे काम एका मराठी माणसाकडून केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिलेला निकाल दिल्लीवरून टाईप करून आला आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१०) हल्ला चढवला. Sanjay Raut
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल दिला. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांना भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. Sanjay Raut
राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीचा आदेश पाळतात, ते काय शिवसेना चालविणार ? असा सवाल करून कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले. त्यांनी काय शिवसेनेची घटना लिहिली आहे का ? आता जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची, आम्ही जनतेच्या न्यायालयात लढू, निवडणुका घ्या, म्हणजे खरी शिवसेना कुणाची हे कळेल. आम्ही या निकालाविरोधात न्यायालयात लढा देऊ, अशी शिवसेना संपवून देणार नाही. शिवसेनेसाठी आम्ही जीव देण्यास तयार आहे. इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. देशातील लोकशाहीचा हा काळा दिवस आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी बेकायदेशीर निकाल दिला आहे. त्यांचा निकाल दिल्लीवरून टाईप करून आला आहे. प्रादेशिक अस्मिता संपविण्याचा हा भाजपचा डाव आहे. गुजराती लॉबीने मराठी माणसाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला सर्व काही दिले, त्या शिवसेनेला वनवासात टाकले आहे.
हेही वाचा 

उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार
Shiv Sena vs Shiv Sena Verdict | मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा! आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना : राहुल नार्वेकर

Latest Marathi News अध्यक्षांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचला : संजय राऊत Brought to You By : Bharat Live News Media.