लाच प्रकरण : अभियंता गणेश वाघाच्या घरात 15 तोळे सोने

नगर : पुढारी वृत्तसेवा :  एक कोटींच्या लाच प्रकरणातील पसार आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक केल्यानंतर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने वाघ याच्या पुण्यातील घराची झडती घेतली. त्यात 15 तोळे सोने, अडीच किलो चांदी, 80 हजारांची रोकड आढळून आली. आता धुळ्यातील घराची झडती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. नगरच्या नागापूर एमआयडीसीमध्ये एक कोटी … The post लाच प्रकरण : अभियंता गणेश वाघाच्या घरात 15 तोळे सोने appeared first on पुढारी.

लाच प्रकरण : अभियंता गणेश वाघाच्या घरात 15 तोळे सोने

नगर : पुढारी वृत्तसेवा :  एक कोटींच्या लाच प्रकरणातील पसार आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक केल्यानंतर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने वाघ याच्या पुण्यातील घराची झडती घेतली. त्यात 15 तोळे सोने, अडीच किलो चांदी, 80 हजारांची रोकड आढळून आली. आता धुळ्यातील घराची झडती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
नगरच्या नागापूर एमआयडीसीमध्ये एक कोटी रुपयांची लाच प्रकरणात पसार गणेश वाघला मुंबई-नाशिक रस्त्यावर नाशिकजवळ पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आली. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्निल रजपूत यांनी वाघ यांच्या आवाजाचे नमुने घेतले असून, तांत्रिक तपास पूर्ण केला.
शुक्रवारी तपास पथकाने वाघ याचे पुण्यातील घराची झडती घेतली. त्यात घरात 15 किलो सोने, अडीच किलो चांदी व 80 हजारांची रोकड जप्त केली. ती संपत्ती बेकायदेशीर आहे की नाही याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्निल राठोड शनिवारी वाघ यांच्या धुळ्यातील घराची झडती घेणार आहे. वाघ यांना छत्रपती संभाजीनगर येथेही घर आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातही घर आहे.
हेही वाचा :

शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकेट स्टेडियम | Mohammed shami
Pune News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी चाचणी

The post लाच प्रकरण : अभियंता गणेश वाघाच्या घरात 15 तोळे सोने appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा :  एक कोटींच्या लाच प्रकरणातील पसार आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक केल्यानंतर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने वाघ याच्या पुण्यातील घराची झडती घेतली. त्यात 15 तोळे सोने, अडीच किलो चांदी, 80 हजारांची रोकड आढळून आली. आता धुळ्यातील घराची झडती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. नगरच्या नागापूर एमआयडीसीमध्ये एक कोटी …

The post लाच प्रकरण : अभियंता गणेश वाघाच्या घरात 15 तोळे सोने appeared first on पुढारी.

Go to Source