पिंपरी : ट्रकला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगात जात असलेला ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबविल्याने ट्रकला पाठीमागून येत असलेली दुचाकी धडकल्याने एकाचा मृत्यू झाला. केशव व्यंकट आवळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 28 ऑक्टोबरला कासारवाडीतील नाशिक-पुणे महामार्गावर घडली. याप्रकरणी कंथक प्रकाश म्हस्के (रा. मोशी प्राधिकरण) यांनी गुरुवारी (दि.16) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंथक हे त्यांचे दोन मित्र केशव आवळे, अमोल आवळे यांसोबत दुचाकीवरून नाशिक फाटा येथून कासारवाडीकडे जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेला ट्रक अचानक सिग्नल न देता रस्त्याच्या मध्येच थांबला. त्यावेळी कंथक यांची दुचाकी ट्रकच्या मागील बाजूला धडकली. या अपघातात दुचाकीवरील केशव आवळे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, फिर्यादीचेदेखील पायाचे हाड मोडले आहे.
हेही वाचा
भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल त्याचा हिशोब राहू द्या : छगन भुजबळ
खरच पिंपरी-चिंचवड प्रदूषणमुक्त होणार का?
मुहूर्त सापडला ! 400 गुरुजींना ‘प्रमोशन’चे गिफ्ट !
The post पिंपरी : ट्रकला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.
पिंपरी : भरधाव वेगात जात असलेला ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबविल्याने ट्रकला पाठीमागून येत असलेली दुचाकी धडकल्याने एकाचा मृत्यू झाला. केशव व्यंकट आवळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 28 ऑक्टोबरला कासारवाडीतील नाशिक-पुणे महामार्गावर घडली. याप्रकरणी कंथक प्रकाश म्हस्के (रा. मोशी प्राधिकरण) यांनी गुरुवारी (दि.16) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध …
The post पिंपरी : ट्रकला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.