पुणे : अनास्थेमुळे ‘ट्रॅफिक पार्क’ बंद

पुणे : मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकात उभारलेले चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क (वाहतूक उद्यान) महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ट्रॅफिक पार्कमध्ये पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करून आणि वारंवार पत्र देऊनही शिक्षण अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वाहतुकीचे … The post पुणे : अनास्थेमुळे ‘ट्रॅफिक पार्क’ बंद appeared first on पुढारी.

पुणे : अनास्थेमुळे ‘ट्रॅफिक पार्क’ बंद

हिरा सरवदे

पुणे : मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकात उभारलेले चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क (वाहतूक उद्यान) महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ट्रॅफिक पार्कमध्ये पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करून आणि वारंवार पत्र देऊनही शिक्षण अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
वाहतुकीचे विविध नियम काय आहेत, नियमांची चिन्हे, त्या चिन्हांचा उपयोग, अर्थ काय अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने या औंध येथील ब्रेमेन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. लहान मुलांना सोप्या पद्धतीने नियम कळतील, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या भागात पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, चौक, स्वतंत्र सिग्नल, पादचारी क्रॉसिंग, तर दुसर्‍या भागात वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहिती चिन्हे, मराठी-इंग्रजीमध्ये माहिती, वाहतुकीसंबंधी 2 ते 3 मिनिटांचा माहितीपट आदींचा समावेश आहे.
हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यापासून सप्टेंबर 2022 पासून जुलै 2023 पर्यंत दहा महिन्यांत 8 हजार 150 जणांनी भेट दिली आहे. यामध्ये महापालिकेच्या 43 शाळा, खासगी 30 शाळा आणि जिल्हा परिषदेच्या 02 अशा 75 शाळांचे 7 हजार 296 विद्यार्थी, 611 शिक्षक आणि 243 विद्यार्थांचे पालकांचा समावेश आहे. विद्यार्थी शाळेतून पार्कपर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा शाळेत सोडण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पाठवणे बंद केले आहे. विद्यार्थी पाठवण्यासंदर्भात पथ विभागाने शिक्षण विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, परिपत्रक काढले आहे. मात्र, त्याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने लाखो रुपये खर्च करून साकारलेले ट्रॅफिक पार्क बंद आहे.
पार्कमधील निवडक बाबी

4 मीटर रुंद आणि 160 मीटर लांबी रस्त्याची प्रतिकृती
रस्त्याच्या प्रतिकृतीमध्ये दुहेरी मार्गिका
पार्किंग व्यवस्था
तीन-चार रस्ते मिळणारे चौक
सिग्नल यंत्रणा
स्वतंत्र सिग्नल यंत्रणेसह सुरक्षित पादचारी क्रॉसिंग
वाहतूकविषयक चिन्हांचे फलक
सर्व चिन्हांची मराठी व इंग्रजी भाषांमध्ये फलकांवर अर्थासह माहिती
विविध रंगांच्या वाहन नंबर प्लेट
वाहतूक चिन्हांचे फलक, विद्युत खांब, सिग्नल याची हुबेहूब प्रतिकृती.
वाहन परवाना समजावा यासाठी 4 फुटी प्रतिकृती.
मुलांसाठी चार प्रकारच्या सायकली व हेल्मेट.
दिव्यांगांनाकरिताही खास सुविधा.
आकर्षक बैठकव्यवस्था.

हेही वाचा
पारनेरमध्ये रोहित पवारांचे लंकेविरोधकांना बळ
शंभरावे नाट्यसंमेलन पुण्यात व्हावे
Pune News : सलोख्यासाठी विद्यापीठ सरसावले!
The post पुणे : अनास्थेमुळे ‘ट्रॅफिक पार्क’ बंद appeared first on पुढारी.

पुणे : मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकात उभारलेले चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क (वाहतूक उद्यान) महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ट्रॅफिक पार्कमध्ये पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करून आणि वारंवार पत्र देऊनही शिक्षण अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वाहतुकीचे …

The post पुणे : अनास्थेमुळे ‘ट्रॅफिक पार्क’ बंद appeared first on पुढारी.

Go to Source