वर्धा : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद; हिंगणघाट पोलिसांची कारवाई

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी केली. त्यांच्याकडून १० हजार ३०० रूपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य जप्त करण्यात आले.
अज्ञात चोरट्यांनी हिंगणघाट येथील मोहता चौकात असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र दुकानाचे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश केला होता. दुकानातील रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून हिंगणघाट डीबी पथकाचे पोलीस अंमलदार यांनी वेकतेश गोडा (रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश), रमेशबाबू मुततुराम कविलपेटी (आंध्र प्रदेश), रंजीत रजनकुमार (रा. तमिळनाडू) या तिघांना ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी बल्लारशा (आंध्र प्रदेश) येथे चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पुढे आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्य़ा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, पोलीस उपनिरीक्षक रमेश मिश्रा, डी. बी. पथकाचे सुमेध आगलावे, प्रवीण बोधाने, अजहर खान, राहुल साठे, आशिष नेवारे, अमोल तिजारे यांनी केली.
हेही वाचा
वर्धा : वन्यप्राण्याचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या दोघांना अटक; वनविभागाची सावंगी परिसरात कारवाई
वर्धा : अल्लीपूर येथील युवतीच्या हत्येप्रकरणी ३६ तासांत आरोपीस अटक
वर्धा : तांदळाच्या गोदामावर छापा, ४५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
The post वर्धा : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद; हिंगणघाट पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी केली. त्यांच्याकडून १० हजार ३०० रूपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी हिंगणघाट येथील मोहता चौकात असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र दुकानाचे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश केला होता. दुकानातील रोकड अज्ञात …
The post वर्धा : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद; हिंगणघाट पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.
