सूर्यकुमार यादवला पाठोपाठ २ दुखापती; शस्त्रक्रिया होणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 चा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या मागील दुखापतीचे शुक्लकाष्ट संपता संपेना झाले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची आगामी टी-20 मालिका खेळू शकणार नाही. तर आता सुर्यकुमारला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यासाठी त्याला ऑपरेशन करावे लागणार आहे. स्पोर्ट्स हर्नियामुळे तो देशांतर्गत क्रिकेट खेळू शकणार नाही. तर आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांना तो मुकण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. (Suryakumar Yadav)
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, सूर्यकुमार यादवचे नुकतेच स्पोर्ट्स हर्नियाचे निदान झाले आहे. तो सध्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. दोन-तीन दिवसांत तो ऑपरेशनसाठी जर्मनीतील म्युनिकला जाणार आहे. दरम्यान, जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेसाठी तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे सूर्याला पूर्ण वेळ विश्रांती दिली जाणार आहे. तसेच या मोसमात रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून तो खेळणार नाही. आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे.
2022 मध्ये भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुललाही स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास झाला होता. त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राहुलही दुखापतीमुळे आयपीएलनंतर काही महिने बाहेर होता.
स्पोर्ट्स हर्निया म्हणजे काय ?
clevelandclinic.org नुसार, स्पोर्ट्स हर्निया, ज्याला ऍथलेटिक पबल्जिया, स्पोर्ट्समॅन्स हर्निया आणि गिलमोर ग्रोइन असे देखील म्हणतात. खालच्या ओटीपोटात किंवा मांडीच्या स्नायूंना दुखापत होती. ज्यामुळे तीव्र वेदना होतात. ज्या लोकांना स्पोर्ट्स हर्निया आहे. त्यांना दुखापतीमुळे मज्जातंतूचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे प्रभावित भागात वेदना आणि संवेदनशीलता वाढू शकते. स्पोर्ट्स हर्निया हे नाव दिशाभूल करणारे आहे. कारण त्यात वास्तविक हर्नियाचा समावेश नाही. वैद्यकीय व्यावसायिक ‘ऍथलेटिक पबल्जिया’ हा शब्द वापरण्यास प्राधान्य देतात. स्पोर्ट्स हर्निया बहुतेकदा खेळाडूंना होतो. अचानक दिशा बदलणे किंवा वेगाने वळणे यामुळे स्पोर्ट्स हर्निया होण्याची शक्यता असते. (Suryakumar Yadav)
हेही वाचा
Suryakumar Yadav | टीम इंडियाला आणखी एक धक्का, क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव गंभीर जखमी
Suryakumar Yadav Record : सूर्यकुमार यादवचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला कधी संधी मिळणार? संपूर्ण विश्वचषक बसून घालवणार?
Latest Marathi News सूर्यकुमार यादवला पाठोपाठ २ दुखापती; शस्त्रक्रिया होणार Brought to You By : Bharat Live News Media.
