अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचा ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात ढोल ताशा वादनाचा मान मिळाला आहे. याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे चंपत राय यांचे निमंत्रण पत्र या पथकाचे प्रमुख प्रतीक प्रमोद टेटे यांना मिळाले आहे. नागपुरातील  हे पथक 24 व 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल ताशा वादन … The post अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचा ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा appeared first on पुढारी.
अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचा ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा: नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात ढोल ताशा वादनाचा मान मिळाला आहे. याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे चंपत राय यांचे निमंत्रण पत्र या पथकाचे प्रमुख प्रतीक प्रमोद टेटे यांना मिळाले आहे. नागपुरातील  हे पथक 24 व 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल ताशा वादन करणार आहेत. यासाठी स्वतंत्र रामधून, हनुमानधून त्यांनी तयार केली आहे. एकंदर 111 वादक हे वादन करतील. यात सुमारे 30 मुली असतील. (Ram Mandir Inauguration)

अयोध्येत रामलल्ला मंदिर परिसरात वादन करताना राम धुन वादनाची खास तयारी या पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. 40  ढोल, 20 ते 25 ताशे, 10 झांज 21 ध्वज यांचा पथकात समावेश आहे.  यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येत आमचे पथक जाऊन आले. राम अयोध्येत परतल्यावर झालेल्या आनंदोत्सवात आम्ही सहभागी झालो ही सेवा त्यांना आवडली आणि हे पुन्हा सेवा देण्याचे निमंत्रण मिळाल्याचा आनंद या पथकातील सदस्यांना आहे. (Ram Mandir Inauguration)

राम मंदिर परिसरासोबतच हनुमान गढी, रामपहाडी येथेही दोन दिवसात वादन होईल,याशिवाय हे पथक अयोध्येला जाण्यापूर्वी नागपुरात ऐतिहासिक श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात जाऊन ध्वजवंदन करणार असल्याची माहिती प्रतीक टेटे यांनी दिली. (Ram Mandir Inauguration)
हेही वाचा:

परळी वैजनाथचा बहुमान; अयोध्येतील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेकरिता विधीचार्यांसमवेत उपस्थित राहणार परळीतील ‘हे’ वेदमुर्ती
Mahashivratri : उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त १८.८२ लाख दिवे प्रज्वलित; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Latest Marathi News अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचा ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा Brought to You By : Bharat Live News Media.