पंधरा वर्षांच्या शेतकर्‍याच्या तेरा गायी दगावल्या आणि…

तिरुवनंतपूरम : अनेक कलाकार सर्वसामान्य लोकांच्या, शेतकर्‍यांच्या मदतीला धावून जात असतात. आपल्याकडे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ने अनेक शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. अशीच मदत आता केरळमध्ये एका लहानग्या शेतकर्‍याला तेथील कलाकारांनी केली. ज्या शेतकर्‍याला या सेलिब्रिटींनी मदत केली आहे, तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. मॅथ्यू बेनी असं या शेतकरी मुलाचे नाव असून, … The post पंधरा वर्षांच्या शेतकर्‍याच्या तेरा गायी दगावल्या आणि… appeared first on पुढारी.

पंधरा वर्षांच्या शेतकर्‍याच्या तेरा गायी दगावल्या आणि…

तिरुवनंतपूरम : अनेक कलाकार सर्वसामान्य लोकांच्या, शेतकर्‍यांच्या मदतीला धावून जात असतात. आपल्याकडे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ने अनेक शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. अशीच मदत आता केरळमध्ये एका लहानग्या शेतकर्‍याला तेथील कलाकारांनी केली. ज्या शेतकर्‍याला या सेलिब्रिटींनी मदत केली आहे, तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. मॅथ्यू बेनी असं या शेतकरी मुलाचे नाव असून, दोन वर्षांपूर्वी म्हणजे त्याच्या वयाच्या 13 व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यापासून तोच शेतीची कामं करतो. आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आपला धाकटा भाऊ आणि बहिणीच्या मदतीने तो शेती करतो; मात्र नुकताच मॅथ्यूला 6 लाखांचा आर्थिक फटका बसला, तो त्याच्याकडील गायी दगावल्याने.
मॅथ्यूकडील 20 गायींपैकी 13 गायींचा अन्नामधून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. सुक्या चार्‍यामधून विषबाधा झाल्याने या गायींचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार या सुक्या चार्‍यामधील हायड्रोकॅनिक अ‍ॅसिडमुळे गायी दगावल्याची माहिती सरकारी अधिकार्‍यांनी दिली आहे. वाळलेली कंदमुळं या गायींना खायला घालण्यात आली होती; मात्र हा असा चारा सामान्यपणे गायींना दिला जात नाही, असंही सरकारी अधिकारी म्हणाले. मॅथ्यूबरोबर घडणारी घटना व्हायरल झाल्यानंतर अभिनेता जयराम यांनी त्याला 5 लाखांची मदत केली आहे. त्यांनी मॅथ्यूला भेट देऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
आपल्या आगामी ‘अब्राहम ओझलर’ नावाच्या चित्रपटाच्या टीमच्या वतीने हा धनादेश जयराम यांनी सुपूर्द केला. जयराम यांनी मॅथ्यूला ‘सर्वकाही लवकरच ठीक होईल,’ असं म्हणत त्याला धीर दिला. ‘अब्राहम ओझलर’ चित्रपटाच्या टीमने त्यांच्या ट्रेलर लाँचसाठीचा इव्हेंटमधील पैसा मॅथ्यूला दिला. त्यांनी या इव्हेंटसाठी खर्च केले जाणारे 5 लाख मॅथ्यूला देऊन ट्रेलर लाँचचा इव्हेंटच रद्द केला. हा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी होणार होता. ‘मीसुद्धा अशा परिस्थितीमधून गेल्याने मला या दु:खाचा अंदाज आहे. आता माझं ध्येय या अशा मुलांना पाठिंबा देण्याचं आहे,’ असं जयराम यांनी म्हटलं आहे. जयराम यांच्या 22 गायी 6 वर्षांपूर्वी चार्‍यातून विषबाधा झाल्याने दगावल्या होत्या. तामिळनाडूमधील कृष्णागिरी येथून आपण उत्तम प्रजातीच्या गायी विकत घेऊन देण्यास मदत करण्याची तयारीही जयराम यांनी मॅथ्यूला बोलून दाखवली. जयराम यांच्याबरोबरच ‘अब्राहम ओझलर’मधील अभिनेते मेहमुट्टी आणि पृथ्वीराज यांनीही अनुक्रमे 1 लाख आणि 5 लाखांची मदत मॅथ्यूजला दिली आहे.
Latest Marathi News पंधरा वर्षांच्या शेतकर्‍याच्या तेरा गायी दगावल्या आणि… Brought to You By : Bharat Live News Media.