दोन दिवसात ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर १, जाणून घ्या WTC गुणतालिका

दोन दिवसात ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर १, जाणून घ्या WTC गुणतालिका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून विजय मिळवला. सिडनी येथे खेळवण्यात आलेला सामना जिंकून पाकिस्तानच्‍या संघाचा मालिकेत 3-0 असा पराभव केला. यापूर्वी भारतीय संघाने केपटाऊन येथे द. आफ्रिकेला पराभूत करून कसोटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान पटकावले होते; परंतू ऑस्‍ट्रेलियाच्‍या पाकिस्‍तानवरील विजयामुळे अवघ्या दोन दिवसांत भारताला प्रथम क्रमांक गमावला आहे. जाणून घेवूयात याबद्दल… (WTC Points Table)
द. आफ्रिकामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने आफ्रिकन संघाला केपटाऊनमध्ये पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान पटकावले होते. परंतु, अवघ्या दोन दिवसात भारतीय संघाची गुणतालिकेत घसरण झाली. कारण, ऑस्ट्रेलियात झालेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 3-0 अशा फरकने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वलस्थानी झेप घेतली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या गुणांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. ऑस्ट्रेलियाचे 56.25 टक्के गुण आहेत. तर भारताचे 54.16 टक्के इतके गुण आहेत. (WTC Points Table)
पाकिस्तानला माेठा फटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गुणतालिकेत पाकिस्तानला माेठा फटका बसला आहे. मालिका पराभवामुळे गुणतालिकेत पाकिस्तानच्‍या संघाची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. पाकिस्तानचा गुण मालिकेपूर्वी ४५.८३ होता; परंतु, आता मालिकेतील पराभवामुळे तो 36.66 वर आला आहे.
गुणातालिकेत अव्वल स्थान पटकवण्याची भारताला संधी
भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकवण्याची संधी आहे.
कशी आहे नवी गुणतालिका?
गुणतालिकेमध्ये 56.25 गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी 54.16 गुणांसह भारतीय संघ आहे. गुणतालिकेत तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्यास्थानी अनुक्रमे द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत. या संघाचे गुण 50 आहेत.

No.1 Test side ⏩ No.1 in the #WTC25 Standings!
Australia continue to dominate 💪
More ⬇️
— ICC (@ICC) January 6, 2024

हेही वाचा :

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा मालिका पराभवाचा ‘षटकार’! वॉर्नरची विजयी खेळी
David Warner Retirement : निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नर भावूक; पत्नी कँडिसला म्हणाला, तू माझं जग…

Latest Marathi News दोन दिवसात ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर १, जाणून घ्या WTC गुणतालिका Brought to You By : Bharat Live News Media.