धक्कादायक ! जमिनीच्या व्यवहारासाठी मृत भावाला दाखवले जिवंत
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मृत भावाच्या जागेवर दुसराच भाऊ उभा करून जमिनीची विक्री करण्यात आली. ही अजब घटना राहुरी येथे घडली. जमीन विक्री करणारे, खरेदी घेणारे व त्या व्यवहाराला साक्षिदार व ओळख देणार्यांविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सिमा रोहिदास धस (रा. एक्सोटिका प्लॉट नं. 56, सेक्टर उलवे, घाटकोपर, नवी मुंबई) या महिलेने वर्षापूर्वी राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय व पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात म्हटले होते, तालुक्यातील पिंप्री अवघड येथे शेत जमीन (गट नं. 127 मधील 0.33 आर) शेत जमीन ही मृत भानुदास रखमाजी धस यांच्या नावावर होती. धस हे (दि. 7 जुलै 2005) रोजी नवी मुंबई येथे मृत पावलेले असताना सदर जमीन त्यांचा भाऊ रामदास धस यांनी भानुदास घस आहे.
संबंधित बातम्या :
Nashik Police : नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले
Nashik Cold : नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर
Weather Update : पुणे, नाशिक गारठले
असे भासवून (दि. 31 जानेवारी 2011) रोजी राहुरी येथील उपनिबंधक कार्यालयात हजर राहून खरेदी घेणारा ठकसेन नरहरी कांबळे (रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी) याने 1 लाख 50 हजार रूपयांत रामदास धस यांच्याकडून खरेदी करून दिली. खरेदीच्यावेळी रामदास धस हेच भानुदास धस आहेत. याबाबत विजय कांबळे तसेच अशोक पिंगळे ( दोघे रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी) या दोघांनी ओळख पटवली. खरेदी खतास साक्षीदार विनायक ठकसेन कांबळे (रा. पिंप्री अवघड व सुभाष तुकाराम गायकवाड (रा. देवळाली प्रवरा) यांनी खरेदी खतावर सह्या केल्या. दरम्यान, सिमा धस यांनी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी होवून आरोपींनी संगनमत करून मृत भावाऐवजी जिवंत भाऊ उभा करून खेरदी खत करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपनिबंधक प्रवीण कणसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून ठकसेन कांबळे, रामदास धस, विजय कांबळे, अशोक पिंगळे, विनायक कांबळे, सुभाष गायकवाड या सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
The post धक्कादायक ! जमिनीच्या व्यवहारासाठी मृत भावाला दाखवले जिवंत appeared first on पुढारी.
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मृत भावाच्या जागेवर दुसराच भाऊ उभा करून जमिनीची विक्री करण्यात आली. ही अजब घटना राहुरी येथे घडली. जमीन विक्री करणारे, खरेदी घेणारे व त्या व्यवहाराला साक्षिदार व ओळख देणार्यांविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सिमा रोहिदास धस (रा. एक्सोटिका प्लॉट नं. 56, सेक्टर उलवे, घाटकोपर, नवी …
The post धक्कादायक ! जमिनीच्या व्यवहारासाठी मृत भावाला दाखवले जिवंत appeared first on पुढारी.