भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था; ‘युनो’ची मोहोर

नवी दिल्ली/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : भारत जगातील सर्वात वाढणारी अर्थव्यवस्था असून, चालू वर्षात भारताचा विकासदर 6.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राने (युनो) व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय अर्थतज्ज्ञांनी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर 7 टक्क्यांवर राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोनानंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने दमदार आगेकूच केल्याने जागतिक स्तरावरील बहुतांश पतमानांकन संस्थांनीही भारत सरकारच्या वित्तीय सुधारणांचे कौतुक केले आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमी सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्टस्’ (डब्ल्यूईएसपी) या ‘युनो’च्या संघटनेने भारतीय विकासदराबाबतचा अहवाल शुक्रवारी जारी केला. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने झेपावत आहे. पुढील वर्षी (2025) भारताचा विकासदर 6.6 टक्क्यांवर जाण्याची चिन्हे आहेत. भारतातील विदेशी गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रातील वृद्धी दरामुळे भारतीय
अर्थव्यवस्था जोमाने वाटचाल करणार आहे. आशियाई देशांचा विकास दर 5.2 टक्के राहणार असून, एकट्या भारताचा विकास दर 6.2 टक्क्यांवर राहणार असल्याचेही ‘युनो’ने म्हटले आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या प्रमाणामध्येही गेल्यावर्षीपेक्षा चालू वर्षात घट होणार असल्याचे ‘युनो’ने या अहवालात स्पष्ट केले आहे.
* 2024 साली भारताचा विकास 6.2 टक्क्यांवर
* आशियाई देशांतही भारतीय अर्थव्यवस्था सर्वोत्तम
* चीनच्या ढासळत्या विकासामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारताकडे ओढा
* वित्तीय तज्ज्ञ म्हणतात, भारताचा विकासदर 7 टक्क्यांवर जाणार
Latest Marathi News भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था; ‘युनो’ची मोहोर Brought to You By : Bharat Live News Media.
