Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रोहित शेट्टीचा धाकड चित्रपट ‘इंडियन पुलिस फोर्स’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Indian Police Force) ओटीटीवर धमाका करण्यासाठी शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय यांचा चित्रपट सज्ज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रासह शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय ओटीटीवर डेब्यू करत आहेत. (Indian Police Force)
संबंधित बातम्या –
‘मुंबई एक त्योहार है’ या मुंबई फेस्टिव्हलच्या गीताचे अनावरण
आपल्या देशाचा जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान – जावेद अख्तर
Deepika Padukone : दीपिकाचे आई होण्याचे संकेत; मुले खूप आवडतात!
चित्रपटामध्ये मसाला, ॲक्शन, ड्रामा असून ट्रेलर ३ मिनिट २ सेकंदाचा आहे. या ट्रेलरची सुरुवात दिल्लीच्या पार्लियामेंटमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाने होणाऱ्या सीनपासून सुरु होते, जिथे आगीचा गोळा दिसत आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातमध्ये म्हटलं जात आहे, ‘आज जो हुआ ये हमला किसी मार्केट पर नहीं हमारी हिम्मत, हमारे जज्बे पर हुआ है। सांप हमारे से खेलना चाहता है पर हम खेलते नहीं, दिल्ली पुलिस खेल खत्म करती है।’
दिल्ली पोलिसांची धाकड टीम
ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टी सिद्धार्थ मल्होत्राच्या सीनियर ऑफिसरच्या भूमिकेत आहेत. त्यामध्ये ती दमदार दिसत आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये शिल्पा-सिद्धार्थ मल्होत्रा चौकशी तपास करताना दिसत आहे.
१९ जानेवारी रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार रिलीज
धाकड पोलिस ऑफिसर्सच्या कथांवर ‘सिम्बा’, ‘सिंघम’ आणि ‘सूर्यवंशी’ यासारखे दमदार ॲक्शन चित्रपट आणलेले रोहित शेट्टी पुन्हा एकदा ‘इंडियन पुलिस फोर्स’ची कहाणी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचे प्रीमियर १९ जानेवारी, २०२४ ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)
Latest Marathi News ‘इंडियन पुलिस फोर्स’चा ट्रेलर पाहाच, सिद्धार्थ-शिल्पा-विवेकची कमाल Brought to You By : Bharat Live News Media.