सारं काही तिच्यासाठी : निशी-नीरज आणि ओवी- श्रीनूची प्रेम परिक्षा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी आणि ओवीच्या आयुष्यात प्रेम परिक्षा चालू आहे. ओवीनिळशीने निर्णय घेतला आहे लंडनला परतण्याचा. तर दुसरीकडे निशी- नीरजच्या प्रेमाला लागला आहे पूर्णविराम. रघुनाथच्या शब्दात निशी अडकली आहे आणि नीरजला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली आहे. पण या सर्व गोष्टींची नीरजला कल्पना नाही.
संबंधित बातम्या
Deepika Padukone : दीपिकाचे आई होण्याचे संकेत; मुले खूप आवडतात!
Indian Police Force Movie : ‘इंडियन पुलिस फोर्स’चा ट्रेलर पाहाच! सिद्धार्थ-शिल्पा-विवेकने केली कमाल
Merry Christmas : कॅटरिना कैफ-विजय सेतुपतीचे ‘नजर तेरी तुफान’ गाणे रिलीज
नीरजने निशीला प्रोपोज करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. एक सुंदर अंगठी ही घेतली आहे. निशी, नीरजचे प्रयत्न पाहून क्षणभरासाठी खुश तर होते. पण, तिच्या मनावर ताण येतोय जेव्हा नीरज तिला लग्नाची मागणी घालतो. ( सारं काही तिच्यासाठी )
निशीला सगळ्या घटनांचा दबाव आल्याने ती आता काय निर्णय घेईल?, ओवीने लंडनला जायचा निर्णय घेतला आहे हे श्रीनूला कळल्यावर तो तिला मनातलं सगळं सांगून तिला थांबवायचा विचार करेल का?, उमा कशी करणार निशी आणि ओवीची मदत?, या प्रश्नाची उत्तरे मालिकेच्या पुढील भागात चाहत्यांना मिळणार आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Latest Marathi News सारं काही तिच्यासाठी : निशी-नीरज आणि ओवी- श्रीनूची प्रेम परिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.