पुढारी ऑनलाईन डेस्क : नयनतारा आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तमिळ सिनेमाची लेडी सुपरस्टार नयनतारासाठी हे वर्ष खूप खास ठरलं. कारण २०२३ मध्ये रिलिलज झालेला शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून तिने धमाकेदार बॉलीवूड डेब्यू केला. (HBD Nayanthara ) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ११०० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. २० वर्षाच्या यशस्वी चित्रपट करिअरमध्ये नयनताराने ९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये तमिळशिवाय तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांचादेखील समावेश आहे. (HBD Nayanthara )
ती साऊथची हाएस्ट पेड अभिनेत्री आहे आणि २०१८ मध्ये तिला फोर्ब्स इंडियाने टॉप सेलिब्रिटी १०० च्या यादीमध्ये स्थान दिले होते. नयनतारा आपला धर्म बदलल्यामुळेही चर्चेत राहिली होती. शिवाय डानसर प्रभू देवासोबत अफेअरआणि नंतर विग्नेश सिवनसोबत लग्न आणि सरोगसी मदरमुळे ती चर्चेत राहिली होती.
बीए पास नयनतारा, पार्ट टाईम मॉडलिंग
नयनताराचा जन्म १८ नोव्हेंबर, १९८४ रोजी बंगळुरु, कर्नाटकात झाला. तिचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. तिचे वडील कुरियन कोडियट्टू इंडियन एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे नयनताराचे शिक्षण अनेक शहरांमध्ये झाले. करण तिच्या वडिलांची बदली होत होती. तिचे जामनगर, दिल्ली, तिरुवल्ला, थिरुमलापुरममध्ये शिक्षण झाले. तिरुवल्लामधून नयनताराने इंग्लिश लिट्रेचरमध्ये बीए केले होते. कॉलेजमध्ये शिक्षणादरम्यान नयनतारा पार्ट टाईम मॉडलिंग करत होती. दरम्यान, तिला दिग्दर्शक सत्यन अन्थिक्क यांनी अनेक मॉडलिंग असाईनमेंट्स पाहून नोटिस केलं आणि चित्रपट ‘मन्नासिन्नाकरे’ची ऑफर दिली.
नयनताराने सुरुवातीला ही ऑफर नाकारली होती. कारण, तिला चित्रपटांमध्ये आवड नव्हती. परंतु, नंतर तिने ही ऑफर केवळ या शर्थीवर स्वीकारली की, ती केवळ एका चित्रपटामध्ये काम करेल. यानंतर नयनताराने २००३ मध्ये चित्रपट फिल्म मन्नासिन्नाकरेच्या माध्यमातून डेब्यू केलं. चित्रपट हिट झाल्यानंतर नयनतारा ‘वेलइक्करन’, ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
‘चेन्नई एक्सप्रेस’ची नाकारली होती ऑफर
शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ गाणयात आयटम सॉन्ग ‘वन टू थ्री फॉर’ करण्यासाठी नयनताराला ऑफर देण्यात आली होती. पण, तिने ही ऑफर नाकारली होती.
प्रभु देवाशी अफेअर
नयनतारा ही प्रभुदेवासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण, प्रभु देवा विवाहित होता.
निर्मात विग्नेश सिवनशी लग्न
प्रभु देवाशी ब्रेकअपनंतर नयनताराचे नाव चित्रपट निर्माता विग्नेश सिवनशी जोडले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट चित्रपट नानुम राउडी धन चित्रपटावेळी झाली होती.
४ BHK घराची किंमत १०० कोटी
नयनतारा आपलय लक्झरी लाईफसाठी प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, ती ३०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे चार आलीशान घरे आहेत. सध्या ती पती विग्नेश सिवनसोबत चेन्नईमध्ये 4 BHK फ्लॅटमध्ये राहते, त्याची किंमत १०० कोटी रूपये आहे.
The post ‘जवान’च्या अभिनेत्रीकडे आहे १०० कोटींचं घर, हिंदू धर्म स्वीकारून… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : नयनतारा आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तमिळ सिनेमाची लेडी सुपरस्टार नयनतारासाठी हे वर्ष खूप खास ठरलं. कारण २०२३ मध्ये रिलिलज झालेला शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून तिने धमाकेदार बॉलीवूड डेब्यू केला. (HBD Nayanthara ) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ११०० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. २० वर्षाच्या यशस्वी चित्रपट …
The post ‘जवान’च्या अभिनेत्रीकडे आहे १०० कोटींचं घर, हिंदू धर्म स्वीकारून… appeared first on पुढारी.